Awaj India
Register
Breaking : bolt
कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत एकदिवसीय धरणे आंदोलनम्हैसूरच्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत कोल्हापूरचा डंका!*चांगल्या जीवनशैलीतून सामाजिक शांतता, राष्ट्रउभारणी शक्य – डॉ. बी. आर. कोरेभारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमानी संघाचे दुसरे महाराष्ट्र राज्य संमेलन २१ नोव्हेंबरलाडी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटीलमुलगा किंवा राजकीय व्यक्तींची स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती होणार नाही _ मुश्रीफ यांची स्पष्टोक्तीगोकुळ’ मध्‍ये वसुबारस निमित्‍त म्हैस व गाय-वासराचे पूजनअध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांनी दोन संचालक द्यावेत; महायुतीची मागणीकोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेला भरघोस निधी उपलब्ध होईल-गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीने समावेश करा*

जाहिरात

 

डी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल १०० टक्के*

schedule21 May 24 person by visibility 874 categoryशैक्षणिक


कसबा बावडा/वार्ताहर
  बारावीचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला असून डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे.  

   विज्ञान शाखेत नेहा राजेंद्र कानकेकर हिने याने ९३.१७ टक्के गुणासह प्रथम क्रमांक मिळवला असून भूविज्ञान व माहिती तंत्रज्ञान या विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. अथर्व पटेल याने ९२.१७ टक्के गुणासह द्वितीय तर श्रेयश कुलकर्णी याने ९०.६७ टक्के गुणासह तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. 

 वाणिज्य शाखेत इंग्रजी माध्यमात वैष्णवी रविंद्र केंबळकर हिने ९५ टक्के गुणासह प्रथम क्रमांक मिळवला आहे. सानिका सोनटक्के हिने ९३.५० टक्के गुणासह द्वितीय क्रमांक मिळवला असून दोघानीही अकौंटन्सी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. प्रियल देशपांडे हिने ९१.८३ टक्के गुण मिळवत तृतीय स्थान मिळवले. तर वाणिज्य शाखा मरठी माध्यममध्ये सायमा इनामदार हीने ६५.५० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

  त्याचबरोबर हर्षिता राजपुरोहित हिने अकौंटन्सी विषयात, प्रज्वल पाटील याने माहिती तंत्रज्ञान विषयात तर इंद्रायणी पाटील व सृष्टी घेवारी यांनी भूविज्ञानमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.

    यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, महाविद्यालयाचे सल्लागार अशोकराव देसाई, प्राचार्य ए. बी. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes