Awaj India
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या विशाखा जितकर यांना शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात मानाचे स्थान*डॉ डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकची बॅडमिंटनमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिक* स्थानिक साहित्य व लोकसहभागातून घडते २७ वर्षांचा अध्यापनाचा यज्ञ: सौ. मधुवंती कडेकर यांचा आदर्श प्रवासडॉ. संजय डी पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त विद्यार्थ्यांकडून सामाजिक उपक्रम**डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर* *वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव*सलग २० वेळा सेट-नेट उत्तीर्ण होण्याचा दुर्मिळ विक्रम; डॉ. राहुल भगवान पालके यांचे भव्य यशरिक्षाचालक असूनही समाजसेवेचा वसा जपणारा ‘आदर्श मावळा’ – सौरभ किरण खोतमावळा न्यूज 24 चे संपादक संग्राम धनाजी पाटील यांचे उल्लेखनीय समाजकार्यसंघर्षातून सेवेकडे : सौ. सोनाली घोडके यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

जाहिरात

 

ट्रिपलसीट व एकेरी मार्ग उल्लंघनावर दोन लाख रुपयांचा दंड वसूल

schedule13 Jun 25 person by visibility 1014 categoryगुन्हे

कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापूर शहरात दुचाकीवरून ट्रिपलसीट फिरणाऱ्या व एकेरी मार्गाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून दोन दिवसीय विशेष मोहिमेत कडक कारवाई करण्यात आली आहे.
 
मा. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार, तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली १२ व १३ जून २०२५ रोजी ही मोहीम राबविण्यात आली.
 
या मोहिमेअंतर्गत:
 
१३७ ट्रिपलसीट दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करत १,३७,०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला.
 
१०५ जणांनी एकेरी मार्गाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६५,५००/- रुपये दंड आकारण्यात आला.
 
एकूण २,०२,५००/- रुपयांचा दंड शहर वाहतूक शाखेकडून वसूल करण्यात आला.
 
 
शहर वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या निरीक्षणाखाली ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित अधिकारी व अंमलदारांनी मोहिमेचे कार्य यशस्वीपणे पार पाडले.
 
शहरातील नागरिकांना वाहतूक शाखेचे आवाहन:
 
पावसाळी हवामान लक्षात घेता वाहने हळू व नियंत्रणात चालवावीत.
 
दुचाकीवर ट्रिपलसीट प्रवास टाळावा.
 
एकेरी मार्गाचे उल्लंघन करू नये.
 
वाहतुकीचे नियम पाळून दंडात्मक कारवाईपासून बचाव करावा.
 
 
शहर वाहतूक शाखेकडून अशा प्रकारच्या मोहीमा पुढील काळातही अधिक विस्तारित स्वरूपात राबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes