शिवसेना समन्वयक सत्यजित (नाना) कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
schedule02 May 26 person by visibility 14 categoryराजकीय
कोल्हापूर : शिवसेना कोल्हापूर जिल्हा समन्वयक मा. सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 3 मे 2026) विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांना शिवसेना कोल्हापूर महानगरपालिकेचे गटनेते शारंगधर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून इतर मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 11 वाजता सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे होणार असून नवजात शिशू व बाल विभागातील बालकांना कपडे व फळांचे वाटप करण्यात येणार आहे.
यानंतर दुपारी 12 वाजता पांजरपोळ संस्था, कोल्हापूर येथे गोमाता पूजन करून सर्व जनावरांना कलिंगडाचे खाद्य वाटप करण्यात येईल.
दुपारी 1 वाजता पंचगंगा हॉस्पिटल येथे नवजात शिशू व बाल विभागातील बालकांना कपडे व फळांचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.
या सामाजिक उपक्रमांमधून वाढदिवस साजरा करताना समाजाप्रती कर्तव्याची जाणीव जपण्याचा संदेश दिला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.