+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustगोकुळ मार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विन्रम अभिवादन... adjustमहापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने अभिवादन adjustआ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील संभाजीनगर बस स्थानक कामाची पाहणी adjustभात व नाचणी विक्रीसाठी शेतकरी नोंदणीस 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ adjustतर के.पी. ना राधानगरी विधानसभेत परिवर्तन शक्य ? adjustकारखान्यासह विधानसभेच्या निवडणुकीत ए. वाय.यांना बाय-बाय? adjustदक्षिण विधानसभा मतदारसंघातील 24000 लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड adjustगोकुळ’ सहकार क्षेत्रातील आदर्श : महेंद्र पंडीत adjustभाजपा जिल्हा कार्यालयात विविध आघाडी मोर्चा कार्यकारणी जाहीर adjustदिव्यांगांची पेंशन वाढ करण्यासाठी शासन पात‌ळीवर प्रयत्न करणार : आ. पाटील
schedule13 Jul 23 person by visibility 66 categoryराजकीय

*शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून पेटाळा मैदानाची पाहणी*   

कोल्हापूर दि. १३ : मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना - भाजप युतीची सत्ता स्थापनेची वर्षपूर्ती झाली आहे. या वर्षभराच्या कालावधीत मुख्यमंत्री ना.शिंदे साहेबांनी अनेक जनहिताचे निर्णय घेतले. शासन आपल्या दारी या उपक्रमातून शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना लोकापर्यंत पोहचविल्या. गत महिन्यात कोल्हापुरात झालेली सभा आणि सभेस कोल्हापूर वासियांनी दिलेला प्रतिसाद पाहता जनतेने मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व मान्य केले आहे. यासोबतच शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची मोर्चेबांधणी यासाठी खासकरून मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या मेळाव्याद्वारे ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचा पेटाळा मैदान येथे आयोजित पदाधिकारी व शिवसैनिक मेळावा "न भूतो न भविष्यती" अशा पद्धतीने यशस्वी करू, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेना उपनेते आनंद जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण आदींनी सभा स्थळाची पाहणी करत, सुरु असलेल्या जय्यत तयारीचा आढावा घेतला. यासह आवश्यक सूचना संबधितांना दिल्या.

            यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वसा चालविणाऱ्या शिवसेनेच्या पक्षबांधणी साठी संपूर्ण राज्यात शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्याच्या सूचना आम्हाला दिल्या आहेत. त्यानुसार कोल्हापुरातच या महिनाभरात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री ना.शिंदे साहेबांचे मार्गदर्शन होणे हे आम्हा शिवसैनिकांसाठी सौभाग्य आहे. पक्षबांधणी आणि आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था अशा सर्व निवडणुकांच्या अनुषंगाने ते शिवसैनिकांना मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापूर जिल्हाचा विचार करता गेल्या वर्षभरात हजारो कोटींचा निधी मुख्यमंत्री साहेबांनी कोल्हापूरसाठी दिला. त्यामुळे कोल्हापूरवासीय ही काम करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. याचे चित्र गत महिन्यातील सभेतून दिसून आले आहे. उद्या होणारा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक जोमाने कार्यरत असून, मेळावा यशस्वी करून आगामी सर्वच निवडणुकात कोल्हापुरातून शिवसेना हा एक नंबरचा पक्ष होण्यासाठी आम्ही जोमाने काम करत आहे. उद्याच्या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिकानी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.   

यावेळी मा.परिवहन सभापती राहुल चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, समन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, जिल्हा युवा संपर्क अधिकारी प्रसाद चव्हाण, शहरप्रमुख पियुष चव्हाण, गणेश रांगणेकर, रणजीत मंडलीक, अंकुश निपाणीकर, रियाज बागवान, ओमकार परमणे, अविनाश कामते, अल्लाउद्दिन नाकाडे, राजू काझी, राजू पुरी, सौरभ कुलकर्णी, विनोद हजारे, सचिन राऊत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.