+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...!
schedule22 Sep 22 person by visibility 140 categoryशैक्षणिकशैक्षणिक

कसबा बावडा/ वार्ताहर

कोल्हापूर : डी. वाय.पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरला इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरीटेज (आयएनटीएसीएच) या राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च हेरीटेज संस्थेचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे कार्य व गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. 

इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरीटेज (आयएनटीएसीएच) अर्थात 'इंटॅक' ची स्थापना १९८४ मध्ये नवी दिल्ली येथे झाली. झाली ही भारतातील प्रमुख हेरिटेज संस्था आहे. टँजिबल, इण्टेनजिबल, नॅचरल आर्ट आणि मटेरियल असे अनेकविध पैलू असलेल्या हेरिटेजना प्रोत्साहन देणे, त्याबाबतची जागरूकता निर्माण करणे या प्रमुख हेतूने ही संस्था कार्यरत आहे.

सांस्कृतिक, नैसर्गिक संसाधने व वारसास्थळे यांसाठी आर्थिक, तांत्रिक व बौद्धिक साहाय्य उपलब्ध करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नैसर्गिक वारसास्थळे आर्किटेक्चरल वारसास्थळे, कला, अमूर्त सांस्कृतिक वारसा, हेरिटेज पर्यटन माहिती केंद्र असे अनेक उपक्रम या संस्थेतर्फे राबविण्यात येणार आहेत.

यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ.लितेश मालदे, वास्तुशास्त्र विभाग अधिष्ठाता प्रा. आर. जी. सावंत, विभाग प्रमुख प्रा. आय. एस. जाधव व सर्व प्राध्यापक यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.