+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustछत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा काढला हा अपमान नाही काय? : राजेश क्षीरसागर adjustशाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरचे समतावादी विचार सिद्ध करा adjustशेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी शाहू महाराजच खासदार आवश्यक : आ. पी. एन. पाटील adjustसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ? : संभाजीराजे छत्रपती adjustसंजय मंडलिक विधानसभेला मुश्रीफ की समरजितराजे सोबत राहणार ? adjust गडहिंग्लज एमआयडीसीसाठी प्रयत्नशील राहू adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये* *फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी* adjustमहाराज जरा लक्ष ठेवा, नाहीतर वटमुखत्यार वाड्यावर नाव लावतील adjustचेतन’ यांचे व्हीजन घेऊनच कोल्हापूरचा विकास करणार ; शाहू छत्रपती adjustपोर्ले येथे सभेत सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन
schedule26 Apr 24 person by visibility 36 categoryराजकीय

कोल्हापूर

इंडिया आघाडी, महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ महालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत आमदार जयश्री जाधव, मधुरिमाराजे यांनी घरोघरी जाउन प्रचार केला.

मंगळवार पेठ येथील कोराणे पॅसेज येथील मिसळ पे चर्चा कार्यक्रमात बोलताना मधुरिमाराजे म्हणाल्या, लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी शाहू छत्रपती या निवडणुकीच्या रिंगणात उभारले आहेत. त्यांना जनतेचा वाढता पाठिंबा मिळत आहे. इंडिया आघाडीतील अनेक पक्षाचे कार्यकर्ते एकदिलाने प्रचार करत आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी शाहू छत्रपतींना विजयी करावे ,असे आवाहन त्यांनी केले .

आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, शाहू छत्रपतींनी सखोल अभ्यास ,कृतीशील विचार आणि दातृत्वाच्या जोरावर कोल्हापुरच्या नागरिकांशी प्रेमाचे नाते जपले आहे. लोकसभेत त्यांच्या अनुभवाचा कोल्हापुरच्या विकासासाठी निश्चित उपयोग होईल.

सौ दश्मिता जाधव म्हणाल्या, कोल्हापुर जिल्हा राजर्षी शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून राधानगरी धरण बांधल्यामुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला आहे. राजर्षी शाहूंच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शाहू छत्रपतींना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी स्नेहा कोराणे,आशा कोराणे, रमेश कोराणे, अक्षय टापरे,अशोक देसाई, गायत्री कोराणे, शारदा बड़ीगेट, निशा देसाई, तेजश्री मुधोळकर, मनीषा शेटे,श्रुती वळंजू, भुमी काळे,सुनीता टापरे,सागर मुधोळकर ,संजय मटकर ,धनंजय देसाई ,शिवाजी मंडलिक,अक्षय देसाई ,मैथिली कारेकर आदि उपस्थित होते .

मंगळवार पेठ परिसरातील मंडलिक वसाहत परिसरातील हॉल मध्ये अंबाबाई रथोत्सवानिमित्त प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या अंबाबाई मुर्तीची पूजा मधुरिमाराजे छत्रपतीं ,आमदार जाधव आणि दश्मिता जाधव यांच्या हस्ते करण्यात आली .श्री देवी इंदुमतीदेवी बोर्डिंगचे दुर्वास कदम ,माजी नगरसेविका वृषाली कदम,सरस्वती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रशासन अधिकारी गीता आवटे उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना दुर्वास कदम यांनी मंडलिक वसाहत, महालक्ष्मीनगर आणि मंगेशकर नगर परिसरातील सर्व मतदार राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून शाहू महाराजांच्या पाठीशी राहतील ,असा विश्वास व्यक्त केला . 

यावेळी मनीषा पाटील, शिवनीता आवटे, दीपक थोरात, संजय पाटील, शरद जाधव, ओंकार पाटील, दिग्विजय आगलावे, जयश्री पाटील, उज्वला सावंत, सलोनी जाधव, पृथ्वीराज पवार, अनिता पवार, गौरी पवार, वत्सला जाधव, माधवी पवार, कल्पना जाधव, सागर जाधव उपस्थित होते