+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. प्रविण कोडोलीकर यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा adjustS3 सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग* adjust*प्रा. प्रविण माने यांना पीएच. डी.* adjustडी वाय पाटील फार्मसी मध्ये* *‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन* adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव. adjust*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा* *डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ adjustजनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा मंत्री हसन मुश्रीफ adjustशाहूप्रेमींच्या साक्षीने अभिवादन
schedule01 May 24 person by visibility 55 category
सत्यजीत कदम यांची बोचरी टीका

 कोल्हापूर : शाहू महाराज छत्रपती आपल्याविषयी सर्वांनाच आदर आहे, पण आपले स्वयंघोषित वटमुखत्यार घेतलेल्यांचे अंतरंग आपल्याला माहित दिसत नाही. यापुढे आपण स्वतः जनतेतून निवडून येत नाही , याची पूर्ण कल्पना असल्यामुळे त्यांनी चाव्या फिरवून काँग्रेसच्या उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात घातली. राजकीय सुळावर आपल्याला चढविले. या पाताळयंत्री माणसावर जरा लक्ष ठेवा , नाहीतर कधी
 वाड्याच्या प्रॉपर्टी कार्डवर त्यांनी आपले नाव लावून घेतले हे आपल्याला लक्षातही येणार नाही, अशी बोचरी टीका सत्यजीत उर्फ नाना कदम यांनी केली.

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते कोल्हापूर येथे बोलत होते.

कदम म्हणाले , "महाराज , हे नेते जिल्ह्यात आज आपले वटमुखत्यार म्हणून वावरत आहेत. यांचा इतिहास जरा जाणून घ्या. यांनी धनगर समाजाच्या जागेवर मेडिकल कॉलेज उभे केले आहे. देवस्थानच्या जमिनीवर हॉस्पिटल उभे केले आहे. शेतकरी संघाच्या जागेवर तारांकित हॉटेल उभे केले आहे. महापालिकेची वाहन तळासाठी आरक्षित जागा त्यांनी हॉटेलचे पार्किंग म्हणून वापरली आहे. साहेबाच्या तळ्यात वॉटर पार्क उभं केलं होतं .शेती महामंडळाची शेकडो एकर जमीन यांच्याच ताब्यात आहे. सत्तेचा उपयोग म्हणा अथवा दुरुपयोग यांच्याकडून शिकून घ्यावा.ते काही समाजसेवा फुकट करणाऱ्यापैकी नाहीत. निवडणुकीत आपल्याला केलेल्या मदतीच्या बदल्यात आपण दिलेल्या वटमुखत्यार पत्राच्या आधारावर कधीतरी हळूच वाड्याच्या प्रॉपर्टी कार्डावर त्यांनी आपले नाव लावून घेतलेले आपल्यालाही समजणार नाही. तेव्हा या वटमुखत्यारच्या हालचालीवर जरा लक्ष ठेवा. एवढीच एक हितचिंतक या नात्याने विनंती आहे , असेही सत्यजीत उर्फ नाना कदम यांनी म्हटले आहे.


चौकट-: महाराजांनी अस्मिता जपण्याऐवजी प्रतिमा जपावी ...
 
निवडणूक प्रचारात कितीही सांभाळलं तरी चिखलफेक होतच राहते. अस्मितेपेक्षा प्रतिमा सांभाळणे महत्त्वाचे असल्याने महाराजांनी ती सांभाळावी, असा सल्ला 
ही महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सत्यजित उर्फ नाना कदम यांनी दिला.