+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. प्रविण कोडोलीकर यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा adjustS3 सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग* adjust*प्रा. प्रविण माने यांना पीएच. डी.* adjustडी वाय पाटील फार्मसी मध्ये* *‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन* adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव. adjust*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा* *डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ adjustजनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा मंत्री हसन मुश्रीफ adjustशाहूप्रेमींच्या साक्षीने अभिवादन
schedule08 May 24 person by visibility 322 category
          
*इटली व स्पेनच्या सहलीसाठी पंधरवड्याची रजा मंजूर*
            
*रजा मंजुरीबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांनी मानले जनतेचे आभार*           
               
*कागल, दि. ८:* 
*महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची जनतेशी ऋणानुबंध घट्ट आहेत. पंधरवड्याच्या परदेशी सहलीवर जातानासुद्धा जनतेकडून रजा मंजूर करून घेणारे ते आगळेवेगळे लोकप्रतिनिधी आहेत. परदेश दौऱ्यासाठीच्या या पंधरवड्याच्या रजा मंजुरीबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांनी जनतेचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आहेत.*
              
*याबाबत अधिक माहिती अशी, इटली व स्पेनच्या सहलीवर पंधरवड्यासाठी जात असलेल्या मंत्री श्री. मुश्रीफ यांनी गेल्या पंधरवड्यापासून प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेकडून पंधरवड्याची रजा मंजूर करून घेतली आहे. शुक्रवारपासून दि. १० ते २४ मंत्री श्री. मुश्रीफ परदेश दौऱ्यावर जात आहे. त्यांच्या कागलमधील घराबाहेरच्या फलकावर याबाबतचे जाहीर निवेदन केले आहे.*
             
*या फलकावर लिहिलेले आहे, चार जून रोजीच्या मतमोजणीसाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा....! पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यावेळी पंतप्रधान निश्चित होतील, याची खात्री व्यक्त केलेली आहे. दरम्यान; येणारा महिनाभर संपूर्ण देशभरात आचारसंहिता सुरू असल्यामुळे या कालावधीमध्ये मतदारसंघ, जिल्हा, राज्य व मंत्रालयामध्ये व्यक्तिगत व विकासाची कामे होत नाहीत. म्हणून; केडीसीसी बँकेच्या सर्व संचालकांनी स्वखर्चाने इटली व स्पेनचा प्रदेश दौरा आयोजित केला आहे.* 
               
*वैद्यकीय सेवा सुरूच राहील.......!*
*या फलकावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हंटलेले आहे, दहा ते २४ मे या कालावधीमध्ये माझा मोबाईल सुरूच असेल. तिथली वेळ ही भारतीय वेळेच्या साडेतीन तास पुढे आहे. अत्यंत आवश्यक काम असेल तर फोन कराच. या काळात वैद्यकीय सेवा ही निरंतरपणे सुरूच असेल. त्यासाठी सकाळी कागलमधील निवासस्थान आणि मुंबईतील मंत्रालयासमोरील अ - ५ या निवासस्थानी रुग्णसेवेसाठी माणसांची व्यवस्था केलेली आहे.*