+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustगोकुळ’ मार्फत आमदार पी.एन.पाटील साहेब यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना adjustडी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल १०० टक्के* adjust*डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या* *१९ विद्यार्थ्यांची बजाज कंपनीमध्ये निवड* adjustडॉ. प्रविण कोडोलीकर यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा adjustS3 सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग* adjust*प्रा. प्रविण माने यांना पीएच. डी.* adjustडी वाय पाटील फार्मसी मध्ये* *‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन* adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव.
schedule30 Apr 24 person by visibility 170 categoryराजकीय
पोर्ले 

सत्यजीत पाटील आबा यांना विजयी करा असे आवाहन सौ प्राजक्ता सत्यजित पाटील यांनी केले पोर्ले तर्फ ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. विकासाची खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरु करूया असे त्या पुढे म्हणाल्या. अध्यक्षस्थानी पन्हाळा तालुका प्रमुख बाबासो पाटील होते.
        यावेळी बोलताना ऍड. विजयसिंह पाटील यांनी आबांना सर्वदूर मिळणारा प्रतिसाद विजयाची नांदी असल्याचे सांगीतले. माजी सभापती संजय चावरेकर यांनी मूलभूत सुविधा गावागावात आणण्यासाठी आपला खासदार असणे आवश्यक आहे असे सांगीतले.
उप तालुका प्रमुख सौ कोमल तांदळे यांनी उध्दव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सत्यजीत पाटील यांना खासदार म्हणून संधी द्या असे सांगीतले. शेवटी तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील यांनी मशाल चिन्ह सर्वापर्यंत पोहोचवा असे आवाहन केले .
यावेळी तालुका प्रमुख सौ चंद्रभागा चौगुले, उप तालुका प्रमुख सौ माया चौगुले, अंगद शेवाळे, एन टी चौगुले, नंदू गुरव, संदीप चौगुले आर डी नांदगावकर यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला.