+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*प्रा. प्रविण माने यांना पीएच. डी.* adjustडी वाय पाटील फार्मसी मध्ये* *‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन* adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव. adjust*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा* *डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ adjustजनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा मंत्री हसन मुश्रीफ adjustशाहूप्रेमींच्या साक्षीने अभिवादन adjustछत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा काढला हा अपमान नाही काय? : राजेश क्षीरसागर adjustशाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरचे समतावादी विचार सिद्ध करा
schedule04 May 24 person by visibility 113 category

 

  मालोजीराजेंचा खासदार मंडलिकांना थेट सवाल

 कोल्हापूर

समरजीतराजे घाटगे यांना जनक घराण्याचे वंशज आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना विचारांचे वारसदार असे खासदार संजय मंडलिक हे सांगत सुटले आहेत, मग उद्याच्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही नक्की कोणाबरोबर असणार, मुश्रीफांचा प्रचार करणार की समरजितराजे घाटगेंचा ? याचा प्रथम खुलासा करावा असा सवाल माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी खासदार मंडलिक यांना केला.  

 

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ सावडे बुद्रुक तालुका कागल येथे जाहीर सभेत बोलत होते अध्यक्षस्थानी महादेव अस्वले हे होते..

 

मालोजीराजे छत्रपती पुढे , ज्यांनी संसदेत कधीही तोंड उघडले नाही.एखादा मोठा प्रोजेक्ट कोल्हापूर जिल्ह्यात आणला नाही. ज्यांना स्वतःचाच दूध संघ विकावा लागला. कारखान्यावर कर्ज वाढले कर्ज काढून कर्मचाऱ्यांचे पगार द्यायची वेळ आली .ज्यांना कारखान्याची शेवटची संचालक मंडळाची बैठक कधी झाली हे आठवत नाही .ज्यांनी नुकत्याच झालेल्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत ज्यांच्या कबरी बांधायची भाषा केली त्यांच्याच हातात हात घालून मतांसाठी फिरत आहेत अशा निष्क्रिय खासदार संजय मंडलिक यांची निष्क्रिय कारकीर्द बदलवायची हीच वेळ आहे 

 

माजी आमदार संजय बाबा घाटगे म्हणाले, भाजपचे सरकार हे केवळ उद्योगपतींसाठीच काम करताना दिसत आहे याचे उदाहरण म्हणजे 370 कलम हटवून साडेतीन हजार एकर जमीन आदानींना देण्यात आली यामध्ये लिथेनियम मिळत असून ते इलेक्ट्रिक बॅटरी साठी उपयोगी पडते . जुन्या संसदेत कामकाज करणारा तिसऱ्यांदा पंतप्रधान होत नाही असे भाकीत कुणीतरी सांगितले म्हणून गोमुख संसद 20 हजार कोटी खर्चून बांधण्यात आली असे अंधश्रद्धा जातीयता समाजात तेढ निर्माण करणारे हे भाजप सरकार आणि त्यांची संस्कृती आत्ताच संपवण्याची गरज आहे 

 

अमरीश घाटगे म्हणाले कुणीतरी मुरगुड चे दिवटे शाहू महाराजांनी काय केले असे विचारत आहेत परंतु त्यांनी पाच वर्षात काय केले? याउलट शाहू महाराजांनी राधानगरी चे वस्तीगृह,परिते येथे 27 एकर मोफत जमीन, चिखली येथे चौदाशे प्लॉट मोफत दिले .कागल मध्ये ही 1640 कुटुंब आज शाहू महाराजांनी दिलेल्या जमिनीवरच जगत आहेत.केवळ नावाने नाही तर कृतीनं त्यांनी शाहू महाराजांचा कार्य तळागाळापर्यंत पोहोचवले आहे जरांगे आंदोलन, ऊस आंदोलन ,कोल्हापूरचा टोल यामध्ये तर त्यांनी सहभाग नोंदवलाच आता शक्तीपीठ महामार्ग घालवायचा असेल तर शाहू महाराजा शिवाय पर्याय नाही .काहीही काम केले नसल्यामुळेच खोके घेणारे आणि खोके देणारे आज गल्लीबोळातून मतांची भीक मागत फिरत आहेत .  

 

कार्यक्रमात वंचित चे राज कांबळे, कॉम्रेड शिवाजी मगदूम, विकास पाटील, शिवानंद माळी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नाना कांबळे, उमाजी पाटील, सागर कोंडेकर, हळदीचे व्हरंबळे मधुकर भोसले आदी प्रमुख उपस्थित होते सूत्रसंचालन सुभाष पाटील तर आभार एस .टी. चव्हाण यांनी मानले ..