+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustछत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा काढला हा अपमान नाही काय? : राजेश क्षीरसागर adjustशाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरचे समतावादी विचार सिद्ध करा adjustशेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी शाहू महाराजच खासदार आवश्यक : आ. पी. एन. पाटील adjustसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ? : संभाजीराजे छत्रपती adjustसंजय मंडलिक विधानसभेला मुश्रीफ की समरजितराजे सोबत राहणार ? adjust गडहिंग्लज एमआयडीसीसाठी प्रयत्नशील राहू adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये* *फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी* adjustमहाराज जरा लक्ष ठेवा, नाहीतर वटमुखत्यार वाड्यावर नाव लावतील adjustचेतन’ यांचे व्हीजन घेऊनच कोल्हापूरचा विकास करणार ; शाहू छत्रपती adjustपोर्ले येथे सभेत सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन
schedule26 Apr 24 person by visibility 75 categoryराजकीय

महाविकास आघाडीच्या महागाव सभेला प्रचंड जनसागर; शाहू छत्रपतींची उमेदवारी हुकूमशाही, दडपशाहीच्या विरोधासाठी : अप्पी पाटील

गडहिंग्लज : प्रतिनिधी
ज्यांच्यासाठी जीवाचं रान केले त्या खासदारांचे काम काय आणि त्यांचे कर्तृत्त्व काय? हे जनतेला व कार्यकर्त्यांनाही आता चांगलेच कळाले आहे. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे गेल्या विद्यमान खासदारांच्या पाच वर्षातील अकार्यक्षमतेची व पुढच्या काळात शाहू छत्रपती महाराजांच्या माध्यमातून विकासाची असणार आहे. उपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांच्या विरोधात ही लढाई आहे. तसेच शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडणार्‍या गद्दारांना त्यांची जागा या निवडणुकीतून दाखवून द्या, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ महागाव (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला प्रचंड संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी उमेदवार शाहू छत्रपती, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते मंडळी उपस्थित होते.
जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील म्हणाले, महागाव व उंबरवाडीच्या भूमीत शाहू छत्रपती महाराज यांचे आगमन झाल्याने ही भूमी पवित्र झाली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे एक विचार आहेत. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा नावलौकिक देशात-विदेशातही पोहोचवला. त्यांचेच वारसदार शाहू छत्रपती आज लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सध्या देशात हुकूमशाही, दडपशाहीचा कारभार सुरू आहे. या विरोधात लढा देण्यासाठी व सर्वसामान्यांसह शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी शाहू छत्रपती यांना संसदेत पाठविण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी येत्या 7 मे रोजी हात या चिन्हावर बटन दाबून शाहू छत्रपती यांना विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शाहू छत्रपती म्हणाले, सत्ताधार्‍यांकडून लोकशाहीची पायमल्‍ली होत असताना याला विरोध करून लोकशाही टिकवण्याचे प्रयत्न इंडिया आघाडीकडून केले जात आहेत. त्यामुळे जनतेने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहून पाठबळ द्यावे.
यावेळी संजय करडे, दिलीप माने, आकलाख मुजावर, रामराजे कुपेकर, गिरीजादेवी शिंदे, नितीन पाटील, अभिषेक शिंपी, गोपाळराव पाटील, प्रा. सुनील शिंत्रे, प्रा. किसनराव कुराडे, स्वाती कोरी, डॉ. नंदाताई बाभूळकर यांनी मनोगत व्यक्‍त केले.
या सभेला चंदगडचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रभाकर खांडेकर, गोडसाखर कामगारांचे नेते शिवाजीराव खोत, अमर चव्हाण, संभाजीराव देसाई, विक्रमसिंह चव्हाण-पाटील, गडहिंग्लजचे माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी, डॉ. संजय चव्हाण, अ‍ॅड. बाळासाहेब चव्हाण, पंचायत समितीचे सदस्य विद्याधर गुरबे, विजयराव पाटील, काँग्रेसचे बसवराज आजरी, डॉ. अजिंक्य चव्हाण. सरपंच प्रशांत शिंदे, काँग्रेसचे नेते अ‍ॅड. दिग्विजय कुराडे, जनता दलाचे नेते बाळेश नाईक, हिरा शुगरचे संचालक सोमगोंडा आरबोळे, शिवानंद मठपती यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, ठाकरे गट शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



गादीबद्दल बोलू नका, माझ्याकडे ’तो’ फोटो आहे!
गादीबद्दल काही लोक प्रश्‍न निर्माण करतात. मी त्यांना सांगितले की महाराजांबद्दल काही बोलू नका, माझ्यावर टीका करा, मी कसलेला पैलवान आहे. त्यामुळे उत्तर द्यायला समर्थ आहे. एकदा अंगावर माती टाकलेली आहे, त्यामुळे कुस्ती खेळायला मागेपुढे बघणार नाही. गादीचा सन्मान राखा. 2019 च्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना महाराजांच्या पाया पडलेला फोटो माझ्याकडे आहे, याची जाण असू द्या, असा इशारा आ. सतेज पाटील यांनी दिला.