Awaj India
Register
Breaking : bolt
रोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ*डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सर्वसाधारण विजेतेपद*लोकशाहीच्या पुन:र्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय :आमदार सतेज पाटील आनदराव पाटील चुयेकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९७%नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्केडी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल ९९.१७ टक्के*मित्र-मैत्रिण नाते किती ग्रेट?निवडणुकीनंतर लाडकी बहीण राज्य सरकारला सावत्र झाली; आमदार सतेज पाटील यांची टिका...शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज ; अरुण डोंगळेशालेय आयडी घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा : प्रवीणभाई माणगावे

जाहिरात

 

 जागतिक ओझोन दिन व ओझोन वायूचे महत्व

schedule16 Sep 20 person by visibility 3531 categoryलाइफस्टाइल

 जागतिक ओझोन दिन व ओझोन वायूचे महत्व: पृथ्वी भोवती असणारे वातावरण महत्त्वाचे आहे. वातावरणामध्ये नायट्रोजन (78.08), ऑक्सिजन (20.94), कार्बन डाय-ऑक्साइड (0.03), ओझोन (0.00006), आॅरगॉन (0.93), नियाॅन, (0.0018), हायड्रोजन (0.00005) ,हेलियम (0.0005), व इतर वायू आढळतात. वातारणाच्या स्थितांबर थरातील ओझोन वायु आढळतो व त्याचे प्रमाण कमी आहे. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांचे शोषण ओझोन वायूमुळे होते व त्यामुळे आपले रक्षण होते म्हणून मानवासाठी ओझोन वायू वरदान आहे व एक प्रकारचे कवच आहे. ओझोन वायूचे महत्व सर्वसामान्य लोकांना माहित झाले पाहिजे व ओझोन वायूचे संवर्धन करण्यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस 'जागतिक ओझोन दिन' म्हणून जगभरात साजरा केला जातो. या वर्षी Ozone for Life: 35 Years of Ozone Layer Protection ही संकल्पना घेऊन आज जगभरात हा दिवस साजरा होत आहे. वातावरणाच्या स्थितांबरात थरात पृथ्वीपासून 15 ते 48 कि.मी उंचीपर्यत ओझोन वायु आढळतो. वातारणाच्या वरच्या थरातील ऑक्सिजन रेणूचे (O2) विभाजन सूर्यकिरणातील अतिनिल लहरी करतात, त्यातून ऑक्सिजनचे अणू (O) तयार होतात. ऑक्सिजनचे अणू (O) इतर ऑक्सीजन रेणूशी (O2) जुळुन ओझोनचा ( O3) हा रेणू तयार होतो. अतिनिल लहरी शोषून पुन्हा इतर ऑक्सिजन रेणूशी जुळून ओझोन मध्ये रुपांतरीत होतात. गेल्या काही वर्षात होणाऱ्या प्रदूषणामुळे ओझोनचे प्रमाण कमी होत आहे. अंटार्टिका खंडावर ओझोन चे होल तयार झाले आहे व त्याचे परिणाम बर्फ वितळणे व तिथे तापमान वाढणे असे दिसत आहेत. क्लोरोफ्लोरो कार्बन(सी एफ सी) हा घटक ओझोनच्या विनाशास कारणीभूत आहेत. फ्रिज, एअरकंडिशनर, प्लास्टिक निर्मिती व उत्पादने व अन्य घटकामुळे या थराचे नुकसान होत आहे. पृथ्वीवरील ओझोन वायूचे प्रमाण कमी झाले तर सूर्यापासून निर्माण झालेल्या अतिनील किरणामुळे कर्करोग, श्वसनांचे व फुफ्फुसांचे आजार, मोतीबिंदू व डोळ्याचे इतर आजार होऊ शकतात. अतिनिल किरणांमुळे वनस्पतीच्या किंवा पिकांच्या वाढीवर व विकासावर परिणाम होईल. जागतिक तापमान वाढ होण्यास मदत होईल. ध्रुवा वरील बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल, सागरी भागाचे तापमान वाढेल, सागरी जीव धोक्यात येतील व पर्यावरणावर परिणाम होईल. जागतिक स्तरावर सगळ्या देशानी एकत्र येऊन मानव निर्मित प्रदुषण कमी करणे गरजेचे आहे तरच आपण ओझोन चे रक्षण करु. पृथ्वीवरील भौगोलिक पर्यावरणाचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. विकास करित असताना नैसर्गिक पर्यावरणाचा नाश होणार नाही याची खबरदारी हवी. भविष्यकालीन पिढ्यासाठी पुरेश्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व सरंक्षण केले पाहिजे तरच शाश्वत विकास साधण्यास मदत होईल.
डाॅ युवराज शंकर मोटे
भूगोल व पर्यावरण विभाग
बाबा नाईक महाविद्यालय, कोकरूड
मो 9923497593
[2:38 PM, 9/16/2020] Yuvaraj Mote Bhugol: आज 16 सप्टेबर आहे जागतिक ओझोन दिन म्हणून हा लेख लिहला आहे आपल्या वाचकांना माहिती होईल म्हणून पाठवत आहे आवाज India Live मध्ये आपण प्रकाशित करू शकता @ Yuvraj Mote

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes