
कोल्हापूर (आवाज इंडिया)
शेतकऱ्याच्या पिकाला दर मिळावा या मागणीसाठी लढणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या विरोधात जय शिवराय स्वाभिमानी किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने हे निवडणूक लढवणार आहेत. याच मतदारसंघात आणखीन एका आंदोलन कर्त्याने शड्डू ठोकला आहे.अठरा वर्ष सामाजिक कार्यात सहभागी असणारे युवा लहुजी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव तांदळे यांनी सुद्धा मैदानात उडी टाकली आहे.
तांदळे आणि युवा लहुजी संघर्ष सेनेच्या वतीने दिल्ली, मुंबई,पुणे, कोल्हापूर या ठिकाणी सतरा वर्ष आंदोलन केली.आरक्षण भूमीहिनांना न्याय मिळावा, वंचितांना न्याय मिळावा, लहुजी वस्ताद साळवे आयोग लागू करावा त्यांचे स्मारक व्हावे आदी मागणीसाठी आंदोलन केलीत.
सध्या त्यांनी या लोकसभाा मतदारसंघावर लक्ष दिले असून शाहूवाडी तालुक्यात सुद्धा दबदबा निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे.निवडे तालुका पन्हाळा येथे वीस वर्षापेक्षा अधिक वेळ त्यांच्या कुटुंबियांनी गावाचे नेतृत्व केले आहे. पंचायत समिती निवडणूक सुद्धा लढवली आहे आता त्यांनी लोकसभा मतदारसंघ टार्गेट केला आहे. गावाच्या समस्यासह तालुक्यातील व लोकसभा मतदारसंघातील सुद्धा विविध समस्येवर आंदोलन करणार असल्याचे तांदळे यांनी सांगितले. हातकणंगले मतदारसंघ आरक्षित असल्याकारणाने या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रचंड मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.