शाही दसरा महोत्सवानिमित्त शुक्रवारी पारंपरिक वेशभूषा दिवस*
schedule04 Oct 24 person by visibility 135 categoryराजकीय
कोल्हापूर, दि. 3(जिमाका): कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
*शुक्रवार 4 ऑक्टोबर रोजी पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात येणार आहे. सर्व शासकीय, निम शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थी, सामाजिक क्षेत्रातील संस्था संघटनांसह सर्व आस्थापना व सर्व नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करुन या उपक्रमात सहभागी व्हावे. तसेच आपल्या ग्रुप ची निवडक छायाचित्रे entkolhapur@gmail.com या मेल वर पाठवावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे..*
****