+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...!
schedule10 Jan 23 person by visibility 669 categoryराजकीय
कोल्हापूर आवाज इंडिया

कोल्हापूर जिल्हा परिषद सहकारी सोसायटी सत्तारूढ पॅनलच्या वतीने कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे‌. यामुळेच त्यांचा विजय होणार असल्याचे सभासदांच्यामधून बोलले जात आहे.
श्री महालक्ष्मी सहकार सत्तारूढ पॅनलच्या वतीने २००९ ते २०२२ पर्यंत संचालक मंडळाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये २०,००० रु. कर्ज देता येणारी संस्था ३५ लाखापर्यंत पगाराच्या पटीत कर्ज पुरवठा व कुटुंब कल्याण निधीतून 100 टक्के कर्ज माफी केली जाते.
 कर्जाच्या व्याजाचा दर १४ टक्के वरून ९.५० टक्के पर्यंत खाली आणले. २००९ चे कायम ठेवीचे व्याज ६ टक्के होते सद्या ते व्याज १०टक्के आहे. २००९ चे वर्गणी ठेवीचे व्याज ६ टक्के होते, सद्याचे व्याज 9.५0 टक्के आहे,२००९ चे शेअर डिव्हिडंड ६ टक्केहोते सद्या ते १२.५० टक्के आहे. सर्व शाखांच्या इमारतीतून उत्पन्नाचे स्त्रोत्र निर्माण केले. संस्थेच्या विविध आकार मानाची ६०० लॉकर्स असून डिपॉझीट माध्यमातून मिळणारे व्याज हे भाडे म्हणून स्विकारले जाते. सभासदांच्या मुलांसाठी ग्रंथालयाची निर्मीती केली असून आतापर्यंत जवळजवळ २८०० पुस्तके उपलब्ध करून दिली. सर्व शाखा संगणीकृत, सी.सी.टी.व्हीने कार्यान्वीत असून सर्व शाखा ऑनलाईन मुख्यालयाशी जोडलेल्या आहेत. सर्व सभासदांना खाते उतारा जामीनकीच्या माहितीसह घरपोच केला जातो. मोबाईल अॅपच्या माध्यमातून सभासदांनी ऑनलाईन व्यावहार चालू केला आहे. कर्ज वसुलीचे प्रमाण ४० टक्के वरून ९६ टक्के पर्यंत वाढले. ही जिल्हा बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कर्ज वसूलीसाठी सहकार आयुक्त यांचेकडून पर जिल्ह्यातील सभासदांच्या कर्ज वसूलीचा अधिकार प्राप्त करुन घेणारी एकमेव संस्था आहे. 
दै. सकाळ मार्फत राज्यातील महत्वपुर्ण काम केलेल्या सहकारी संस्थांमधील एक संस्था म्हणून या संस्थेचा सन्मान "सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र" या पुरस्काराने सन्मानित केले.कोरोना काळात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासाठी रुपये २ लाख देवून समाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच सन २००८/२००९ रोजी दिलेल्या वचपुर्तीची १०० टक्के पुर्तता केली.