+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustविशाल अनिल आवडे यांना पुरस्कार adjustउद्योगजकांशी सरंक्षण क्षेत्रातील संधीबाबत जनरल विनोद खंदारे यांचे मार्गदर्शन adjustविकास कामाच्या 'ऋतू' मध्ये निधीचा 'अमल' न झाल्याची टीका adjustशाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विनय कोरे यांची डोकेदुखी वाढणार adjustशाही दसरा महोत्सवानिमित्त शुक्रवारी पारंपरिक वेशभूषा दिवस* adjustपुढील पाच वर्षात आणखी जोमाने काम करणार : आ. जयश्री जाधव adjustलोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी शुक्रवारपासून *दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर* adjustहळदी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाजीराव चौगले adjustराज्यातील गरजूंपर्यंत प्रबोधनातून शासकीय योजनाही पोहोचवाव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* adjustकिरण लोहार यांचा सन्मान
schedule22 Aug 24 person by visibility 174 category
लाडका बांधकाम कामगार योजना जाहीर करा... लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेची मोर्चाद्वारे मागणी 
१५ दिवसानंतर कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या निवासस्थानावर मोर्चाचा इशारा... 

कोल्हापूर : बांधकाम कामगारांच्यासाठी लाडका बांधकाम कामगार योजना जाहीर करून, बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा या मागणीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर सुमारे २५ हजार बांधकाम कामगारांचा मोर्चा काढण्यात आला, या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ भरमा कांबळे, जिल्हा सचिव कॉ शिवाजीराव मगदूम, जिल्हा उपाध्यक्ष कॉ भगवानराव घोरपडे, सिटुचे कार्याध्यक्ष कॉ चंद्रकांत यादव यांनी केले.
       सदर मोर्चा आयुर्विन ख्रिश्चन ग्राऊंडवरून, गवत मंडई येथून, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर काढण्यात आला, मोर्चेकऱ्यांनी हातात लाल झेंडे घेऊन संपुर्ण परीसर लाले लाल केला होता... 
           मोर्चामध्ये दिवाळीला २० हजार रुपये अर्थसहाय्य द्या,६० वर्षांवरील बांधकाम कामगारांना १० हजार रुपये पेन्शन द्या,घरकुलासाठी ४.५० लाख रूपये अनुदान द्या, या व अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला, सदर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला... 
        यावेळी बोलताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे म्हणाले, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणी, नूतनीकरण व लाभाच्या अर्ज भरण्यासाठी खाजगी ठेकेदार नेमले आहेत ते ताबडतोब रद्द केले पाहिजेत, 
लाभाच्या अर्जाचे स्लॉट देत असताना जिल्ह्यात नोंदीत, असलेल्या बांधकाम कामगारांची संख्या विचारात घेऊनच किमान दररोज 800 अर्ज पडताळणी करा अशी मागणी केली. 
                कॉ भगवानराव घोरपडे म्हणाले, तपासणी ते उपचार या योजनेमध्ये पेशंट हॉस्पिटलला गेल्यानंतर त्याचे नूतनीकरण असेल तर त्याला व त्याच्या कुटुंबीयांना कोणतीही अच न लावता, विना अट उपचार दिले पाहिजेत, व घरकुल योजनेचे अर्ज ताबडतोब मंजुर कले पाहिजेत अशी मागणी केली. 
             कॉ शिवाजी मगदूम म्हणाले, जिल्ह्य़ातील किमान ४०० घरकुले बाधुन पुर्ण झालेले आहेत, त्या घरकुलांचा शेवटचा ५० हजार रूपयाचा हप्ता तातडीने जमा करावा अशी मागणी केली. 
यावे कॉ चंद्रकांत यादव यांनी बांधकाम कामगारांनी राजकारणात सक्रिय होऊन आपली राजकीय ताकद दाखवली पाहीजे व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ातील सर्वच जागा लढविल्या पाहिजेत असे आवाहन केले. 
    या मोर्चामध्ये, तृटीत काढलेले नोंदणी, नूतनीकरण, व लाभाचे अर्ज ज्या नोंदणी अधिकाऱ्यांनी त्रुटीत काढलेले आहे त्यांनाच अपडेट करायला भाग पाडा व तो अर्ज त्यांच्याकडूनच मंजूर करून घ्या,
महापुरामध्ये लाभाच्या अर्जाच्या पडताळणीसाठी ज्या कामगारांना पूर परिस्थितीमुळे येता आले नाही त्यांच्या अर्ज पडताळणीसाठी वेगळी दिनांक द्यावी,  
संसारसट वाटपामध्ये चाललेला राजकीय दबाव टाळावा व कामगार संघटनांना एक न्याय व राजकीय नेते मंडळींना एक न्याय असा दुजाभाव होता कामा नये याची दक्षता घ्यावी,ज्या कामगारांचे लाभाचे अर्ज मंजूर होऊनही खात्यावर जमा झालेले नाहीत त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर का जमा झालेले नाहीत त्याचे मेसेज संबंधित कामगारांना पाठवावेत,घरकुल योजनेमध्ये पडताळणी झालेल्या घरकुलांची तातडीने बैठका लावुन सर्व अर्ज तात्काळ मंजुर करा, मृत्यू लाभासाठी विवाह नोंदणी अट रद्द करा, तालुका स्तरावरील कार्यालयाकडे शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा,मंडळाकडील सर्व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना मंडळाकडे कायम करा,लाभाची पडताळणी झालेल्या कामगारांच्या ज्या दिवशी विविध लाभाच्या कागदपत्रांची पडताळणी आहे त्याच दिवशी लाभाचा अर्ज मंजुर करावा,कुटुंबातील एकाच व्यक्तीला संसारसटाचा लाभ मिळत आहे, त्यामुळे कांही कुटुंबामध्ये वाद होत आहेत, सदर वाद टाळण्यासाठी सरसकट नोंदीत कामगारांना संसारसट द्यावा,विविध योजनांच्या लाभाचे अर्ज ऑफलाईनने घ्या व स्लॉट ओपन झाल्यानंतर त्यांचे अर्ज तात्काळ भरा,१० हजार रूपयाच्या आतिल लाभासाठी प्रत्यक्ष पडताळणीची अट शिथील करा,मृत्यु लाभासाठीची स्लॉट पद्धत तात्काळ बंद करा.तपासणी ते उपचार मोहीमेतुन योजने बाहेरील हॉस्पिटलमध्ये केलेल्या उपचाराचा परतावा मिळावा.. 
आदी मागण्या केल्या आहेत, सदर मागण्याचा १५ दिवसात सकारात्मक निर्णय करा अन्यथा १५ दिवसानंतर कामगार मंत्री नाम. सुरेशभाऊ खाडे यांच्या निवासस्थानावर मोर्चा इशाराही देण्यात आला आहे.. 
यावेळी कॉ भरमा कांबळे, कॉ शिवाजी मगदूम, कॉ प्रकाश कुंभार, कॉ भगवानराव घोरपडे, कॉ संदिप सुतार, विक्रम खतकर, शिवाजी मोरे, आनंदा कराडे, मोहन गिरी, रमेश निर्मळे, नामदेव पाटील, राजाराम आरडे, दगडू कांबळे, दिलीप माने, रामचंद्र नाईक, शिवाजी कांबळे, संतोष राठोड, उदय निकम, दिलीप माने, दत्ता गायकवाड, विजय विरळेकर, दत्ता कांबळे, नुरमहमद बेळकुडे
या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह हजारो कामगरउपस्थित होते..