Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पी. साळोखेनगर मध्ये रविवारी "सतेज मॅथ्स स्कॉलर" परीक्षेचे आयोजन*डी.वाय. पाटील च्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट चुये येथे आज पासून श्री दत्त जयंती सोहळा महापुरुषांचे विचार शालेय अभ्यासक्रमात असावेत : कौस्तुभ गावडे कर्तृत्ववान मुख्याध्यापिका सौ. सुहासिनी उदय कदम यांचा प्रेरणादायी प्रवासआदर्श व्यक्तिमत्व मुख्याध्यापक आत्माराम विश्वनाथ सोनोने धनश्री मोहिते विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाची उज्ज्वल परंपरा आदर्श शिक्षक जनार्दन मधुकर कांबळे सर : विद्यार्थ्यांच्या घडवणुकीसाठी समर्पित कार्यशैलजा पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी सुनंदा प्रकाश मुसळे : सेवेतून आदर्श घडवणाऱ्या शिक्षिका

जाहिरात

 

घरफोडी चोरी प्रकरण उघडकीस : 15.29 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

schedule05 Jun 25 person by visibility 520 categoryगुन्हे

 
कोल्हापूर ; शहरातील शनिवार पेठ येथे झालेल्या घरफोडी चोरीचा तपास करून लक्ष्मीपुरी पोलिसांनी एक विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून सोन्याचे 18.5 तोळे वजनाचे दागिने व रोख रक्कम मिळून एकूण 15,29,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार गुप्ता यांनी घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष निर्देश दिले होते. या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. श्रीराम कन्हेरकर, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, यांच्या पथकाने तपास सुरू केला.
गुन्हा क्रमांक 230/2025 भारतीय दंड संहिता कलम 305(अ) अंतर्गत दाखल असून, फिर्यादी शुभांगी सुजय म्हेत्रे (वय 50 वर्षे, रा. सोन्या मारुती चौक, शनिवार पेठ, कोल्हापूर) यांनी 25 मे 2025 रोजी आपल्याच्या राहत्या घरी झालेल्या चोरीची तक्रार दिली होती.
चोरीस गेलेला मुद्देमाल:
सोन्याच्या पाटल्या – 2 नग (12 तोळे)
सोन्याचे कडे – 1 नग (4 तोळे)
डायमंडची अंगठी – 1 नग (5 ग्रॅम)
सोन्याच्या अंगठ्या – 3 नग (2.5 तोळे)
रोख रक्कम – ₹29,500/-
एकूण मालमत्ता किंमत – ₹15,29,500/- 
तपासामध्ये पोलीस अंमलदार क्र. 2383 तानाजी दावणे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून संबंधित बालकास ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर वरील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस अधीक्षक श्री बी. धीरज कुमार, मा. उपविभागीय अधिकारी श्री अजित टिके, तसेच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री दिगंबर गायकवाड व त्यांच्या पथकातील अंमलदार – प्रितम मिठारी, गजानन परीट, किशोर पवार, मंगेश माने, प्रतीक शिंदे – यांच्या अथक प्रयत्नातून पार पडली आहे.
 
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes