Awaj India
Register
Breaking : bolt
कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा* *‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ ने सन्मान*कोल्हापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे 'कर्जमाफी आंदोलन'; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडककोल्हापुरात महिला सक्षमीकरणासाठी 'स्वराज्य महिला मंच' सज्ज; आज कार्यालयाचे भव्य उद्घाटनडॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा विशेष शोप्रत्येक जिल्ह्यात ईएसआयसी रुग्णालय उभारणार - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर* ग्रामीण भागाच्या विकासासाठी समाज कल्याण विभाग कटिबद्ध: सभापती श्रद्धा गायकवाड​निपाणी-गारगोटी रोडवर ३.६३ लाखांच्या मुद्देमालासह गुटखा आणि कार जप्त“एक पाऊल प्रगतीकडे, जिल्हा परिषद अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे!”शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी साताप्पा विष्णू पाटील उपाध्यक्षपदी गजानन सखाराम कांबळे चुये येथील एस. एच. पी. हायस्कूलचा दहावीचा निकाल ९८% टक्के; सई पाटील विद्यालयात प्रथम

जाहिरात

 

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा* *‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ ने सन्मान*

schedule14 May 26 person by visibility 7 category

-सिम्युलेशन शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल गौरव
-एलिव्हेट हेल्थकेअरचे आंतरराष्ट्रीय संचालक रिचर्ड लिवसी यांच्या हस्ते सन्मान
कोल्हापूर :आवाज इंडिया प्रतिनिधी 
 
सिम्युलेशन आधारित वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टीपूर्ण आणि जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करणाऱ्या कार्याबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांना 'द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. एलिव्हेट हेल्थकेअरचे आंतरराष्ट्रीय संचालक रिचर्ड लिवसी यांच्या हस्ते डॉ. पाटील यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘अ पार्टनरशिप बिल्ट ऑन व्हिजन’ हा पुरस्कारदेखील त्यांना प्रदान करण्यात आला. 
 
डॉ. संजय डी. पाटील यांनी सिम्युलेशन शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य आणि डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाच्या या सिम्युलेशन सेंटरची जागतिक पातळीवर ओळख निर्माण केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी ‘सेलिब्रिटिंग अ व्हीजन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी डी. वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र- कुलपती तथा विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, एलिव्हेट हेल्थकेअरचे नॅशनल हेड प्रवीण मित्तल, डी वाय पाटील विद्यापीठ मुंबईचे प्रोजेक्ट हेड वृंदन जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
 
सिम्युलेशन शिक्षण संचालिका डॉ. शिंपा शर्मा यांनी प्रास्ताविक केले. तर सेंटर हेड डॉ. संकेत पाटील यांनी गेल्या पाच वर्षातील सेंटरची कामगिरी आणि प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी सिम्युलेशन सेंटरच्या प्रवासावरील चित्रफित दाखवण्यात आली.
 
यावेळी बोलताना रिचर्ड लिवसी यांनी डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, आपण जगभरातील अनेक सिम्युलेशन सेंटर्सना भेटी दिल्या. यामध्ये डी. वाय. पाटील विद्यापीठात उभारण्यात आलेले सिम्युलेशन अँड स्कील सेंटर हे दूरदृष्टी, गुणवत्ता आणि नवोपक्रम यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. डॉ. संजय पाटील यांनी भारतात सिम्युलेशन आधारित शिक्षणाला नवे आयाम दिले असून वैद्यकीय क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 
 
ते पुढे म्हणाले, २०२० मध्ये कोविड महामारीच्या कठीण काळात डॉ. पाटील यांनी सिमुलेशन अँड स्किल सेंटर सुरू करण्याचे धाडस दाखवले. त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे हे सेंटर आज जागतिक स्तरावर प्रेरणादायी मॉडेल म्हणून ओळखले जात आहे. या केंद्रामार्फत आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना व प्रशिक्षणार्थींना लाभ झाला असून १ लाख १३ हजार ६६१ तासांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच २ हजार ५८६ प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. 
 
रिचर्ड लिवसी म्हणाले ‘प्रत्येक मोठ्या प्रवासात कर्मचारी मेहनत करतात; मात्र त्यांना दिशा देण्याचे काम कॅप्टन करतो. वैद्यकीय शिक्षणाला आधुनिक सिम्युलेशन आधारित पद्धतीकडे नेण्याच्या या प्रवासाचे खरे कॅप्टन डॉ. संजय डी. पाटील हे आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे हजारो विद्यार्थी अधिक सक्षम आणि सज्ज होत आहेत. त्यामुळेच ‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ने त्यांना सन्मानित करताना आनंद होत आहे.
 
मागील पाच वर्षापासून एलिव्हेट हेल्थकेअर व डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ यांच्यात सिम्युलेशन शिक्षण भागीदारी आहे. विश्वासपूर्ण आणि वैद्यकीय प्रशिक्षणाचे भविष्य घडविण्याच्या सामयिक ध्येयावर आधारित या भागीदारीबद्दल ‘अ पार्टनरशिप बिल्ट ऑन व्हिजन’ हा पुरस्कारदेखील लिवसी यांच्या हस्ते डॉ. पाटील यान प्रदान करण्यात आला. 
 
कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा म्हणाले, डॉ. संजय पाटील यांच्या विद्यार्थीकेंद्री दृष्टीकोनामुळे विद्यापीठाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. संशोधन, कौशल्य आणि तंत्रज्ञान यांचा उत्कृष्ट संगम त्यांनी घडवून आणला आहे.
 
सत्काराला उत्तर देताना डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, सिम्युलेशन आधारित शिक्षणामुळे आरोग्य क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी, डॉक्टर्स यांना अधिक आत्मविश्वासाने उपचार करता येतात. भविष्यातही जागतिक दर्जाच्या सुविधा आणि आधुनिक शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. लवकरच मेडिकल कॉलेजच्या नव्या 23 मजली इमारतीमध्ये एका पूर्ण मजल्यावर या सिम्युलेशन सेंटरचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना अतिशय समृद्ध अनुभव मिळेल याचा विश्वास वाटतो. हा पुरस्कार म्हणजे विद्यापीठाचे सर्व अधिकारी, प्राध्यापक. कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्व सहकाऱ्यांच्या मेहनतीची पावती आहे.
 
सिम्युलेशन सेंटरसाठी योगदान देणाऱ्या, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आणि संशोधन क्षेत्रात कामा करणाऱ्या अधिकारी प्राध्यापक यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही व्ही भोसले, डी. वाय. पाटील विद्यापीठ नवी मुंबईचे कुलसचिव डॉ. नितीन सिप्पी, सिम्युलेशन शिक्षण संचालिका डॉ. शिंपा शर्मा, सेंटर हेड डॉ. संकेत पाटील, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, सी.एच.आर.ओ श्रीलेखा साटम, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, उपअधिष्ठाता डॉ. पद्मजा देसाई यांच्यासह विद्यापीठाचे सर्व अधिकारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थांचे प्रमुख, विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सुरुची पवार, डॉ. रश्मी बावडेकर, डॉ. अमृता पवार यांनी केले. तर आभार डॉ. राजेश ख्यालप्पा यानी मानले.
 
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes