कोल्हापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे 'कर्जमाफी आंदोलन'; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
schedule14 May 26 person by visibility 21 categoryराजकीय
कोल्हापूर (आवाज इंडिया प्रतिनिधी )
कोल्हापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे 'कर्जमाफी आंदोलन'; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
कोल्हापूर:
राज्यातील शेतकरी कर्जमाफीसोबतच विविध मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळांच्या लाभार्थ्यांचेही कर्ज माफ करावे, या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जिल्हा कोल्हापूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य 'कर्जमाफी आंदोलन' आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाद्वारे सामाजिक न्याय आणि उपेक्षितांच्या हक्कांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
प्रमुख मागण्या:
कर्जमाफी: महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ, मौलाना आझाद महामंडळ, खादी ग्रामोद्योग आणि अपंग आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांची कर्जमाफी तातडीने करावी.
योजनांमधील सुधारणा: दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात.
निधीचे संरक्षण: सामाजिक न्यायाचा निधी इतरत्र वळवू नये.
अतिक्रमण नियमितीकरण: गायराणातील अतिक्रमणे केवळ निवासापुरती मर्यादित न ठेवता, छोटे व्यवसाय आणि अल्पभूधारकांची शेडसह सर्व अतिक्रमणे २०२५ पर्यंत कायम करावीत.
विद्यार्थी सवलती: मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महागाईनुसार वाढीव शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्ता वेळेवर मिळावा.
ऐतिहासिक संवर्धन: जिल्ह्यातील बौद्ध अवशेष स्थळांचे (उदा. सम्राट अशोक कालीन बौद्ध लेणी, पन्हाळा) संशोधन व संवर्धन व्हावे.
शाहू-भीम स्मारक: जुन्या शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या जागी राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीच्या स्मृतीप्रित्यर्थ 'शाहू-भीम स्मारक' उभारावे.
नेतृत्व आणि आवाहन:
हे आंदोलन आरपीआय (आठवले) चे जिल्हा कार्याध्यक्ष आयु. दत्ता मिसाळ आणि जिल्हा सचिव आयु. सतिश माळगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. "आपल्या न्याय हक्कासाठी आणि सामाजिक न्यायासाठी" या आंदोलनात हजारोच्या शुक्रवारी 15 मे रोजी सकाळी 10 वाजता संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्ष संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.