गडहिंग्लज मधला भ्रष्टाचार, ॲपचा घोटाळा सत्ताधाऱ्यांना भोवणार
schedule12 Jan 23 person by visibility 150 categoryराजकीय
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या निवडणूक
कोल्हापूर आवाज इंडिया
कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीत सत्ताधारी मंडळींनी मोबाईल अॅपच्या खरेदीत घोळ केला आहे " तर गडहिंग्लज शाखेत घोटाळा केला असल्याचा आरोप विरोधी राजर्षी शाहू स्वाभिमानी पॅनेलच्या तालुक्यातील प्रचार मेळाव्यात करण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ विरोधी आघाडीचा प्रचार मेळावा तालुक्यात ठीक ठिकाणी झाला. या प्रचार मेळाव्यात बोलताना विरोधी आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी मंडळींच्या कामकाजावर टीकास्त्र सोडले.
पॅनेल प्रमुख सचिन जाधव, मार्गदर्शक प्रकाश देसाई, अंगणवाडी संघटनेच्या सुरेखा कदम, मनीषा पालेकर, संगीता गुजर, बबलू सनदी आदींच्या उपस्थितीमध्ये मेळावे झाले. तालुक्यातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. पॅनेल प्रमुख सचिन जाधव यांनी "राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीला संपूर्ण जिल्ह्यातून सभासद मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. सभासदांनी यंदा सोसायटीमध्ये बदल घडवायचा असा निश्चय केला आहे."असे सांगितले.
तर गडहिंग्लज मधला भ्रष्टाचार व ॲपचा भ्रष्टाचार सत्ताधाऱ्यांना भोवणार असा आरोपी जाधव यांनी केला.
दरम्यान विरोधी आघाडीचे नेते ए. व्ही. कांबळे, एस.ए.गायकवाड, सुभाष इंदुलकर यांनीही कागलसह अन्य भागामध्ये प्रचार दौरा केला.
विरोधी आघाडीमार्फत सभासद हितासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीत विरोधी आघाडीने सर्वसमावेशक पॅनेल उभे केले आहे. सभासदाने विरोधी या आघाडीला संधी द्यावी असे आवाहन यावेळी पॅनेलच्या नेते मंडळांनी केले. या प्रचार दौऱ्यात विरोधी या आघाडीचे सगळे उमेदवार सहभागी होते.