+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये* *फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी* adjustमहाराज जरा लक्ष ठेवा, नाहीतर वटमुखत्यार वाड्यावर नाव लावतील adjustचेतन’ यांचे व्हीजन घेऊनच कोल्हापूरचा विकास करणार ; शाहू छत्रपती adjustपोर्ले येथे सभेत सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन adjustगद्दार खासदाराला कायमचे घरी बसवा adjustसतेज पाटील यांच्या सुडाच्या राजकारणाला कंटाळून भाजपप्रवेश ; नेर्लीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश पुजारी adjustआमच्या विरोधकांनी आता किमान अजिंक्यतारा वरून येणारी स्क्रिप्ट तरी बदलावी adjustविकासकामांच्या आडवे याल तर याद राखा ; कसबा बावड्याचा विकास हेच शिवसेनेचे ध्येय adjustमंडलिक यांनी 27 पैसे तरी कोणाला देऊन माहिती आहेत का? adjustजनतेला फसवत विश्वासघात, गद्दारी करणाऱ्या संजय मंडलिकांना पराभूत करा
schedule07 Jan 24 person by visibility 77 categoryउद्योग
*

कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकच्या शंभूराज भोसले आणि रोहन शिंदे यांची कॅम्पस इंटरव्ह्यू मधून दुबई येथील नामवंत कंपनीमध्ये निवड झाली आहे. हे दोघे मेकॅनिकल विभागात अंतिम वर्षात शिकत आहेत. वार्षिक ९ लाख ६० हजार रुपयांचे पॅकेज या विद्यार्थ्यांना मिळाले आहे.

    डी. वाय. पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील यांच्या हस्ते आणि कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ.महादेव नरके, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. नितीन माळी यांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शुभेच्छ देताना डॉ पाटील म्हणाले की, पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांची निवड निश्चित कौतुकास्पद आहे. या संधीचे सोने करून स्वतःचा आणि संस्थेचा नावलौकिक वाढवा. 

डॉ गुप्ता यांनी यापुढील काळातही विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील असे नमूद केले.

 पॉलिटेक्निकमधील शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रोत्साहन ,शिक्षकांचे मार्गदर्शन हे या यशाचे गमक असल्याचे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. प्रा.नितीन माळी यांनी आभार मानले.

कसबा बावडा: दुबईमध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या शंभूराज भोसले आणि रोहन शिंदे यांचे अभिनंदन करताना डॉ. संजय डी. पाटील. समवेत डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. महादेव नरके, प्रा. नितीन माळी आदी.