Awaj India
Register
Breaking : bolt
ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी* *डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट*डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *गौरी गीते स्पर्धा उत्साहात*बेलवळे खुर्द सरपंचपदी अनिता पाटील बिनविरोध राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ स्पर्धेत* *कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय प्रथम*वंचित बहुजन आघाडीच्या करवीर तालुकाध्यक्षपदी नितीन कांबळेअवयवदान :मृत्यूनंतरचे खरे अमरत्त्व!डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसकडून* *एआय आधारित हाय व्होल्टेज स्विचिंग युनिटचे संशोधन*मराठवाड्यात ‘गोकुळ’ ची दूध व दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करणार; नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 303 विद्यार्थ्यांची* *आयआयटी बॉम्बेतील ‘एडटेक इंटर्नशिप’साठी निवड*

जाहिरात

 

अभियंत्यांनी स्वतःला अपडेट ठेवावे : उपअभियंता धनंजय भोसले

schedule20 Mar 23 person by visibility 258 categoryशैक्षणिक

डी. वाय.पाटील पॉलिटेक्निक मध्ये ई-टेंडरिंग कार्यशाळा संपन्न

कसबा बावडा
कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचे असेल तर गुणवत्ता असणे आवश्यक आहे.स्पर्धेच्या युगामध्ये अभियंत्यांनी स्वतःला अपडेट ठेवावे ,असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाहुवाडी विभागाचे उपअभियंता धनंजय भोसले यांनी केले.

 कसबा बावडा येथील डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये ई टेंडरिंग या विषयावरील एक दिवसोय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

 श्री भोसले पुढे म्हणाले, सिव्हील इंजिनिअरिंगची चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करणे महत्त्वाचे ठरू शकते. त्यासाठी सचोटी, परिश्रमाची तयारी, कामाप्रती समर्पण आणि प्रामाणिक प्रयत्न या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

प्राचार्य डॉ.महादेव नरके म्हणाले की, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाहेरील गोष्टींचे ज्ञान उपलब्ध होण्यासाठी पॉलिटेक्निक तर्फे सातत्याने प्रयत्न केले जातात.या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निश्चितपणे वाढेल.

 महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या समन्वयक वनिता पाटील यांनी सांगितले की, सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये होत आहे. असे उपक्रम होणे ही काळाची गरज आहे असेही त्यांनी नमूद केले.

औरंगाबाद येथील ई टेंडर गुरुचे संस्थापक हर्षद बरगे यांनी ई टेंडर फॉर्म कसा भरावा, लायसन्स कशी काढावी, कामे मिळण्यासाठी कोणत्या प्रकारची कागदपत्रे असणे आवश्यक असते, डिजिटल सही कशी काढावी आदी गोष्टीबद्दल सहभागी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच या विद्यार्थ्यांकडून त्यांनी प्रात्यक्षिकही करून घेतले.

 यावेळी कार्यशाळा समन्वयक प्रा.शिवांगी मालवीया,उपप्राचार्य प्रा.एम.पी.पाटील ,सिव्हील विभागप्रमुख प्रा.अक्षय करपे, प्रा.बी.जी.शिंदे उपस्थित होते.


जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes