+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustजनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा मंत्री हसन मुश्रीफ adjustशाहूप्रेमींच्या साक्षीने अभिवादन adjustछत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा काढला हा अपमान नाही काय? : राजेश क्षीरसागर adjustशाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरचे समतावादी विचार सिद्ध करा adjustशेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी शाहू महाराजच खासदार आवश्यक : आ. पी. एन. पाटील adjustसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ? : संभाजीराजे छत्रपती adjustसंजय मंडलिक विधानसभेला मुश्रीफ की समरजितराजे सोबत राहणार ? adjust गडहिंग्लज एमआयडीसीसाठी प्रयत्नशील राहू adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये* *फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी* adjustमहाराज जरा लक्ष ठेवा, नाहीतर वटमुखत्यार वाड्यावर नाव लावतील
schedule17 Jul 20 person by visibility 2101 categoryउद्योग
आवाज इंडिया न्यूज
कोल्हापूर -(प्रतिनिधी):
ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार नवा कायदा बनवत आहे. गेल्या काही महिन्यात ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं पाऊल उचलले आहे. ग्राहक संरक्षण कायदा -2019 (Consumer Protection Act-2019) हा नवीन कायदा सोमवारपासून लागू केला जाणार आहे.
नवीन कायदा ग्राहक संरक्षण कायदा 1986चं स्वरूप आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी ही माहिती दिली आहे. या नवीन कायद्याची अंमलबजावणी होताच जुन्या कायद्यात नसलेल्या ग्राहकांच्या हिताचे नवीन नियम लागू केले जाणार आहेत.
नवीन कायद्याची ही आहेत वैशिष्ट्ये...
नवीन कायद्यांतर्गत ग्राहकांना दिशाभूल करणार्‍या जाहिराती दाखवल्यास कारवाई केली जाणार आहे.
ग्राहक देशातील कोणत्याही ग्राहक न्यायालयात गुन्हा दाखल करू शकतो
ऑनलाइन आणि टेलिशॉपिंग कंपन्यांचा प्रथमच नव्या कायद्यात समावेश होणार आहे
खाण्या-पिण्यातील भेसळ करणार्‍या कंपन्यांना दंड व तुरुंगवासाची तरतूद
ग्राहक मेडिएशन सेलची स्थापना, दोन्ही पक्षकार परस्पर संमतीने मेडिएशन सेलमध्ये जाऊ शकतील
पीआयएल म्हणजे याचिका आता ग्राहक मंचामध्ये दाखल करता येणार आहे. आधीच्या कायद्यात तशी तरतूद नव्हती
ग्राहक मंचामध्ये सुमारे एक कोटी खटले दाखल करता येणार आहेत
राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग एक कोटी ते दहा कोटीपर्यंतच्या प्रकरणांची सुनावणी करेल.

राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगात दहा कोटींपेक्षा जास्त प्रकरणांची सुनावणी
संरक्षण कायदा 2019 खूप आधी तयार करण्यात आला आहे. हा कायदा काही महिन्यांपूर्वीच लागू होणार होता, परंतु कोरोना महारोगराईचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे कायद्याची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता हा नवीन कायदा पुढील आठवड्यापासून लागू होणार आहे.
हा कायदा म्हणजे ग्राहकांसाठी शस्त्र आहे. अन्याय झालेल्या ग्राहकांनी याचा वापर केला पाहिजे. सरकारने केलेल्या या कायद्याचे स्वागत आहे. कायद्यासंदर्भात माहिती पाहिजे असल्यास अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर विनामूल्य सहकार्य करेल.

-अरुण यादव, जिल्हाध्यक्ष,अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कोल्हापूर