गुरुवंदना' महोत्सव या सांगितीक कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
schedule22 May 24 person by visibility 528 categoryउद्योग

कोल्हापूर ; आवाज इंडिया
विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड संचलित 'नादब्रह्म' संगीत गुरुकुल, कोल्हापूर यांच्या तर्फे 'गुरुवंदना' महोत्सव २०२४ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे यंदाचे हे १० वे वर्ष आहे.
या निमित्ताने रविवार दिनांक २६ मे २०२४ या दिवशी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत सांगितीक मैफिल आयोजित केली आहे.
या प्रसंगी श्री. शफात नदाफ, सतार व श्री. अमोल राबाडे, बासरी यांचे सहवादन व श्री. सोनिक वेलिंगकर, गोवा यांचे एकल बासरीवादन होणार आहे. यांना तबला साथ श्री. प्रसाद लोहार, व श्री. सुमित शेडबाळे हे करणार आहेत.
या वर्षीचा 'नादब्रह्म' संगीत जीवन गौरव पुरस्कार, कोल्हापूरचे ज्येष्ठ हार्मोनियम वादक श्री. रघुनाथ सबनीस सर व श्री. द्वारकानाथ पै यांना प्रदान करण्यात येणार आहे. संगीत कलेची समृद्ध परंपरा असलेल्या आपल्या करवीर नगरीत या दोन जेष्ठ कलाकारांचे संगीत क्षेत्रात खुप मोलाचे योगदान आहे. तसेच साहित्य क्षेत्रात आपल्या लेखन कलेचा ठसा उमटवणाऱ्या लेखिका व अनुवादिका, मुक्त पत्रकार व २०२० चा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त सोनाली नवांगुळ यांना देखील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी
अमोल राबाडे संगीत विशारद (बासरी, तबला) यांच्याशी संपर्क ( - ८४५९८२६५६७) करावा.