
जिल्हा मध्यवर्ती शाखेची उल्लेखनीय कामगिरी
कोल्हापूर ;मार्चपासून जगाबरोबर कोरोना आला. सर्व काही बंद झाले. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू होत्या; यापैकी एक अत्यावश्यक सेवा म्हणजे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. या बँकेच्या जिल्हा परिषदेच्या शाखेने उत्तम सेवा केलीय. कोरोना असूनदेखील बँकेत येणाऱ्याबरोबर न येणाऱ्यालाही ही घरपोच सेवा दिली. याबद्दल याशाखेबाबत जिल्ह्यात कौतुक केले जातय.
लॉक डाउन झाल्यापासूनच कोणतीही सुट्टी रजा न घेता बँकेशी संबंधित असणाऱ्या सभासद ठेवीदार सर्वांना सर्व सुविधा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा परिषद शाखेने पुरवल्यात. कोरोणामुळे वृद्ध अपंग लोक, बाहेर पडत नव्हते अशांना घरी जाऊन पैशाचं वाटप केलय. बँकेत येणाऱ्यानाही ही योग्य दक्षता बाळगत प्रत्येक कर्मचाऱ्याजवळ सॅनिटायझर ठेवत दक्षता बाळगली. संजय गांधी निराधार योजना निधीचे वाटप करत असतानाही नियोजन बद्दल व्यवस्था केली होती. कोरोणा झालेल्या ठेवीदारांना सुद्धा घरात जाऊन पैशाचे वाटप केले.
या शाखेला 450 कोटी रुपयांचे टार्गेट होतं. कोरोणा असून सुद्धा ते टार्गेट पूर्ण करत 500 कोटी ठेवी जमा केल्यात. दोन कोटी 82 लाख रुपयाचा नफाही मिळवून दिलाय. यासाठी बँकेचे चेअरमन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ए.बी माने सर्व अधिकारी यांचे सहकार्य लाभले. शाखाधिकारी एस. बी. उस्ताद यांच्यासह सर्व स्टाफ कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलय.