रिमझिम गिरे सावन....' ने कार्यक्रमाची उंची वाढवली
schedule10 Jun 24 person by visibility 339 category

कोल्हापूर ; आवाज इंडिया
अम्रपाली कुरणे यांनी गायलेल्या 'ऋतू हिरवा...' या गाण्याने कार्यक्रमाला सुरूवात झाली. संग्राम पाटील 'घन आज बरसे...' व साई लकडे यांनी 'झुंजूर मुंजूर...' ही गीते सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. तर कबीर नाईकनवरे यांनी 'रिमझिम गिरे सावन....' हे गीत सादर करून कार्यक्रमाची उंची वाढवली. बाहेर प - त्यक्ष पाऊस बरसत असताना शाहू स्मारक भवनमध्ये पावसाच्या गाण्यांची सुरेल बरसात होत होती. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात गायकांना दाद दिली.
प्रयोदी फाउंडेशन आणि अश्वघोष आर्ट अँड कलचरल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'रिमझिम गिरे सावन...' या गाण्यांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. गायक प्रशांत शिराळे, आम्रपाली कुरणे यांनी गायलेल्या 'निसर्ग राजा...' या गाण्यावर तर प्रेक्षक डोलायला लागले. त्यानंतर सई लकडे आणि कबीर नाईकनवरे यांनी 'चिंब पावसान... हे गीत सादर करताच रसिकांनी टाळ्यांच्या गजरकरीत ताल घरला होता. त्यानंतर संग्राम व अम्रपाली यांनी 'मेघा रे मेघा रे.... रवींद्र इनामदार यांनी 'आज मौसम बड़ा बेईमान है... अशी गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. 'गारवा.... निले निले अंबर...', सावन में लग गई आग.... 'अधिर मन झाले...' अशी एकसे बडकर एक गाण्यांचे सादरीकरण केले. कार्यव माच्या शेवटी 'हिंदयी वसंत फुलताना...' हे गीत सर्वच गायकांनी एकत्रित सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. बाहेर पाऊस बरसात असताना रसिक शाहू स्मारक सभागृहात पावसाच्या सुरेल गाण्यांमध्ये न्हाऊन गेले होते. सभागृहात रसिकांची प्रचंड गर्दी केली होती. यावेळी संयोजक प्रयोदी फाऊंडेशनच्या अध्यक्षा योगिता कोडोलीकर, शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉ. प्रविण कोडोलीकर, अश्वघोष आर्ट अँड कलचरल फौंडेशनचे अध्यक्ष कबीर नाईकनवरे,प्रा.डॉ. सरोज बिडकर, राज्य मंत्रालय गृह विभागाचे उपसचिव विजय पोवार, मिनल राजहंस ,मंदार पाटील, ऋतुराज माने , अभिजित राऊत, बाळासाहेब भोसले, संपदा मुळेकर, किशोर घाडगे, अनिल लवेकर,रणजीत माजगांवकर डॉ.सत्यजित कोसंबी,मदन पवार,सागर बगाडे,विजय टिपूगडे,रमेश भोसले,डॉ.समाधान बनसोडे,राजेंद्र बनसोडे आदी उपस्थित होते,या कार्यक्रमाचे निवेदन प्रविण बनसोडे यांनी केले आणि आभार आनंद भोजने यांनी केले.