
कोल्हापूर आवाज इंडिया
कोल्हापूरच्या आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जिल्हाध्यक्ष मा. उत्तमदादा कांबळे यांच्या (5 फेब्रुवारी) वाढदिवसाचे औचित्य साधून .'संघर्ष' राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन 2 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी केले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन
मा. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते होणार असून यांचा अमृतमहोत्सवी सत्कारही या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा खा राजू शेट्टी हे असतील तर प्रा.शहाजी कांबळे,मंगलराव माळगे,रूपाताई वायदंडे
राजेंद्र ठीकपूरलीकर,दत्ता मिसाळ, बाळासाहेब वाशीकर, गुणवंत नागटिळे, अविनाश शिंदे, प्रदीप मस्के,संजय लोखंडे यांसहित अन्य रि.पा.ई तालुका, जिल्हा व राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम 10051,
द्वितीय 7051,
तृतीय 5051 रोख सन्मानपत्र व सन्मानचिन्ह तसेच
उत्तेजनार्थ (प्रत्येकी पाच) पारितोषिके असून यासाठी 1051 रुपये सन्मानचिन्ह व सन्मानपत्र अशी पारितोषिके आहेत. या स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे 1)सत्तेच्या सारीपाठावर सुरू आहेत चौकशीच्या फेऱ्या, मी निष्ठावंत म्हणणाऱ्यांच्या खूप झाल्या पक्षीय वाऱ्या.2) आधुनिक भारताच्या उभारणीची पायाभरणी, मूकनायकाच्या बोलक्या लढ्याची अस्सल कहाणी.3) पुरोगामी विचारांचा राजमान्य राजयोगी बहुजनांचा लोकराजा राजर्षी शाहू महाराज.4) आंबेडकरी चळवळीतील लढवय्या पॅंथर नाम.रामदास आठवले.5) बघा मी माझा समाज कसा जागवतो , इथे बुद्ध पेरला की, बाबासाहेब उगवतो.6) कोल्हापूरच्या पुरोगामी चळवळीतील दोन तपाचा संघर्षयात्री उत्तमदादा कांबळे.7) जोतीबाच्या भाच्या, तुकोबाच्या मुला... फाशी घेणं, जहर खाणं शोभतं का तुला ? 8) दलित पॅंथरच्या 50 वर्षाच्या परिप्रेक्षातून आंबेडकरी चळवळ.9) वेदनेला जात नसते.. पण जातीच्या वेदना असतात असे विषय आहेत. तरी या स्पर्धेसाठी परिवर्तनवादी, अभ्यासू ,विचारशील. अशा सबंध महाराष्ट्रातील युवा वक्त्यांना ऐकण्यासाठी सर्वच विचारांच्या परिवर्तनवादी कार्यकर्त्यानी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक वैभव प्रधान व विजय काळे यांनी केले.