+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमार्केट सेसच्या सुधारित जी आर चे व्यापाऱ्यांच्याकडून साखर पेढे वाटून स्वागत adjustपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून बांधकाम कामगारावर अन्याय adjustकेंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांचा जिल्हा दौरा adjustमिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* *कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम* adjustकोल्हापुरातील महायुतीच्या तीन विधानसभा मतदार संघात ठिणगी adjustमहायुतीचे कोल्हापुरातील तीन विधानसभा मतदारसंघ धोक्यात adjustविशाल अनिल आवडे यांना पुरस्कार adjustउद्योगजकांशी सरंक्षण क्षेत्रातील संधीबाबत जनरल विनोद खंदारे यांचे मार्गदर्शन adjustविकास कामाच्या 'ऋतू' मध्ये निधीचा 'अमल' न झाल्याची टीका adjustशाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विनय कोरे यांची डोकेदुखी वाढणार
schedule24 Jul 24 person by visibility 401 category



कोल्हापूर (प्रशांत चुयेकर)

पणोरे (तालुका पन्हाळा) या गावाला वीस वर्ष शाळेची इमारत नाही. खाजगी मालकाच्या इमारतीमध्ये शाळा भरते. डाग -डुजीलाही पैसे नसल्याकारणाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाण्यात बसून पणोरे गावच्या मुलांना शाळा शिकावी लागत आहे.गावच्या मुलांना हक्काची शाळेची इमारत नाही म्हणून आज ग्रामस्थांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन या विरोधात चर्चा केली.
  कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी शाळेची पाहणी केली. शाळेची झालेली दयनीय अवस्थेत संदर्भात सकारात्मक चर्चा केली. पन्हाळा तालुक्यातील पणोरे हे एक मोठ्या लोकसंख्येचे गाव असून गावाला क्षेत्रफळ देखील जास्त आहे तरी देखील गावच्या प्राथमिक शाळेला स्वमालकीची जागा नसल्याने इमारतीचा प्रश्न बरेच वर्ष प्रलंबित आहे. 
यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी व ग्रामपंचायत पणोरे व शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्याकडून वेळोवेळी निवेदने आंदोलने करून देखील प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे शाळेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

शाळेत इयत्ता पहिली ते सातवी चे वर्ग असून शाळेची पटसंख्या 184 आहे शाळेने केंद्र तालुका राज्य पातळीवर विविध स्तरावर नावलौकिक केला आहे. हे चिमुकले विद्यार्थी प्रशासनाच्या अंधकारभारामुळे विज्ञानाच्या प्रगत युगात देखील पाण्यात बसून शिक्षण घेत आहेत.
 शाळा इमारत मागणीसाठी वेळोवेळी शासन स्तरावर प्रस्ताव देऊन ही कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. सदर जागा खाजगी मालकीची असून शाळेच्या इमारतीमधील वर्ग हे पाण्यामध्ये आहेत. शाळेच्या इमारतीतील वर्ग पावसामुळे मोडकळीस व गळती लागल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
 या संदर्भात शुक्रवार दि-26 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तीव्र आंदोलन करण्याचे घटनास्थळी ठरविण्यात आले. याप्रसंगी पालक,तरून कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.