+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमार्केट सेसच्या सुधारित जी आर चे व्यापाऱ्यांच्याकडून साखर पेढे वाटून स्वागत adjustपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून बांधकाम कामगारावर अन्याय adjustकेंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांचा जिल्हा दौरा adjustमिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* *कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम* adjustकोल्हापुरातील महायुतीच्या तीन विधानसभा मतदार संघात ठिणगी adjustमहायुतीचे कोल्हापुरातील तीन विधानसभा मतदारसंघ धोक्यात adjustविशाल अनिल आवडे यांना पुरस्कार adjustउद्योगजकांशी सरंक्षण क्षेत्रातील संधीबाबत जनरल विनोद खंदारे यांचे मार्गदर्शन adjustविकास कामाच्या 'ऋतू' मध्ये निधीचा 'अमल' न झाल्याची टीका adjustशाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विनय कोरे यांची डोकेदुखी वाढणार
schedule23 Jul 24 person by visibility 93 category
कोल्हापूर ;
देशात सर्वाधिक कर महाराष्ट्र भरतो. मात्र, या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. केंद्रातील नेतृत्व महाराष्ट्राचा इतका राग का करते हे कळत नाही. बिहार व आंध्र प्रदेशसाठी जाहीर केलेल्या योजना पाहता हा अर्थसंकल्प या दोन राज्यांसाठीच मांडला असल्याचे दिसते. अशी टीका विधान परिषदेचे गट नेते सतेज पाटील यांनी केली

लोकसभा निवडणुकीत तरुणांनी हिसका दाखवल्यानंतर रोजगाराच्या संधीचा खोटा आभास तयार करणारे बजेट मांडले आहे. या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने बेरोजगारांना खोटी आश्वासने तर दिलीच पण सर्वसामान्य घटकांनाही लॉलिपॉप दाखवले आहे. 

      एनडीएमध्ये एकनाथ शिंदे सहभागी असतानाही महाराष्ट्रात एकही प्रकल्प त्यांना आणता आलेला नाही. याउलट नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांनी स्वतः च्या राज्यासाठी लाखो कोटींची तरतूद मिळवली आहे. आधीच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. त्यात अर्थसंकल्पातही महाराष्ट्राला डावलून या राज्याचे महत्व कमी करण्याचा केंद्रातील शीर्षस्त नेत्यांचा डाव आहे. पण, राज्यातील जनता ही साप्त्नक वागणूक विसरणार नाही. जसा लोकसभेला धडा शिकावला त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकांमध्येही या दुजाभावाचे योग्य उत्तर जनता देईल असेही आमदार पाटील म्हणाले.