+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपाच वर्षे निष्क्रिय राहिलेल्या खासदाराचा करेक्ट कार्यक्रम करा adjustशाहू महाराजांच्या प्रचारार्थ एक मे रोजी शिव-शाहू निर्धार सभा adjustमहाराणी ताराराणी, राजर्षी शाहू महाराज यांना राजे राजवर्धन कदमबांडे यांनी केले अभिवादन adjust*१ मे ला 'O, Freedom..!' चे प्रकाशन* adjustसंविधानाबाबत गैरसमज पसरविणाऱ्या कॉंग्रेस प्रवृत्तीला कायमचे गाडा. " : राजेश क्षीरसागर; adjustमंडलिक, माने यांना विजयी करा ; राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन कदमबांडे adjustप्रवक्त्याचे वटमुखत्यारपत्र जाहीर सभेत चालते, संसदेत नाही; adjustशाहू विचार दर्शन पदयात्रेत समतेचा जागर adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही : नितीन बानुगडे-पाटील adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन*
schedule15 Apr 24 person by visibility 81 categoryराजकीय

छत्रपती परिवारातील सदस्यांचीही उपस्थिती : जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून घटक पक्षांचे नेते-कार्यकर्ते सहभागी होणार

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी, महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती आज मंगळवारी (दि. 16 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी इंडिया आणि महाविकास आघाडीकडून जोरदार शक्‍तीप्रदर्शन करण्यात येणार असून त्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. या शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता असून कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे या शक्‍तीप्रदर्शनाकडे लक्ष लागून राहिले आहे. माजी खासदार संभाजीराजे, मालोजीराजे, संयोगिता राजे, मधुरिमाराजे, शहाजीराजे, यश राजे देखील यावेळी काढण्यात येणार्‍या रॅलीत सहभागी होणार आहेत.  
ऐतिहासिक दसरा चौकातून सकाळी दहा वाजता शक्‍तीप्रदर्शन मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. त्यासाठी मुस्लीम बोर्डिंगजवळ भव्य मंडप उभारण्यात आला आहे. जिल्ह्याततील कानाकोपर्‍यातून काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, डावे पक्ष, आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडीचे नेते, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या शक्‍तीप्रदर्शनात सहभागी होणार आहेत. कोल्हापूर शहरासह कोल्हापूर दक्षिण, करवीर, गगनबावडा, कागल, गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा तालुक्यातील कार्यकर्ते या शक्‍तीप्रदर्शनासाठी रवाना होणार आहेत.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शिवसेना उपनेते व जिल्हा प्रमुख संजय पवार, जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, डॉ. नंदिनी बाभुळकर, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा व जनता दलाच्या प्रमुख स्वाती कोरी, जिल्हा बँकेचे संचालक अप्पी पाटील, दौलत कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळ पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक सत्यजीत जाधव, काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कोल्हापूर शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेना ठाकरे गट कोल्हापूर शहराध्यक्ष रविकिरण इंगवले व सुनील मोदी, आम आदमी पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संदीप देसाई, पिपल्स रिपब्लिकनचे दगडू भास्कर, भाकपचे सतीशचंद्र कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार यापूर्वीच जाहीर केला आहे. त्यादृष्टीने त्यांनी जंगी तयारी केली आहे. शिवसेना युवा सेनेच्यावतीने मोटार सायकल रॅलीही काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातून इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणार असल्याने वाहतुकीची होणारी संभाव्य कोंडी लक्षात घेऊन पार्किंगची ठिकाणे निश्‍चित केली जाणार आहे. तसेच दिशादर्शक फलकही उभारले जाणार आहेत. गेल्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ झाल्याने उन्हाचा तडाखा जाणवत आहे. यासाठी जिल्ह्यातून येणार्‍या कार्यकर्त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय दसरा चौक तसेच मिरवणूक मार्गावर तीस ठिकाणी केली जाणार आहे.