+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustS3 सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग* adjust*प्रा. प्रविण माने यांना पीएच. डी.* adjustडी वाय पाटील फार्मसी मध्ये* *‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन* adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव. adjust*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा* *डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ adjustजनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा मंत्री हसन मुश्रीफ adjustशाहूप्रेमींच्या साक्षीने अभिवादन adjustछत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा काढला हा अपमान नाही काय? : राजेश क्षीरसागर
schedule28 Apr 24 person by visibility 79 categoryराजकीय

कोल्हापूर

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (१५० व्या) जयंतीच्या औचित्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्याचा जागर करण्यासाठी आयोजित केलेल्या शाहू विचार दर्शन पदयात्रेत समतेचा जागर पहायला मिळाला. मावळा कोल्हापूर फौंडेशने या उपक्रमाचे आयोजन केले होते. पदयात्रेत साहित्यीक, खेळाडू, सामाजिक कार्यकर्त्यासह युवक आणि युवतींचा सहभाग होता.

दिगंबर जैन बोर्डिंग येथुन सकाळी साडेसात वाजता राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आणि शाहू विचारांची ज्योत प्रज्वलित करुन पदयात्रेस सुरुवात झाली. तासगावचे युवानेते रोहित पाटील, डॉ. रवी जाधव, अर्बन बँकेचे संचालक संभाजीराव जगदाळे, शाहीर रंगराव पाटील, दिलीप सावंत, मावळा संघटनेचे उमेश पोवार,आपचे पश्चिम महाराष्ट्र संघटक संदीप देसाई, यशस्विनीराजे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय जाधव, माजी नगरसेविका भारती पोवार, अमित पाटील, संदीप पाटील, संग्राम भोसले यांच्यासह शेकडो युवक युवती सहभागी झाले होते.  

 राजर्षी शाहूंनी स्थापन केलेल्या शहर परिसरातील प्रत्येक वसतिगृहांना आणि वास्तूंना भेट देण्यात आली. त्यामध्ये व्हिक्टोरिया मराठा, सारस्वत समाज , लिंगायत, कायस्थ प्रभू समाज, मुस्लीम, पांचाळ, मिस क्लार्क, शाहू वैदिक स्कूल, इंदुमती देवी बोर्डिंग, देवल क्लब, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग मैदान, जुना राजवाडा, मोतीबाग तालीम, गुरू महाराज वाडा, दैवज्ञ बोर्डिग, प्रिन्स शिवाजी बोर्डिंग, सुतार बोर्डिंग, नाभिक बोर्डिंग, वैश्य बोर्डिंग, सोमवंशी आर्यसमाज बोर्डिंग, सत्यशोधक समाज, गंगाराम कांबळे स्मृतीस्तंभ या मार्गावरुन पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाउ साठे यांच्या प्रतिमेचे फलक होते. तसेच शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या वसतीगृहातून शिकलेले कॉ. गोविंद पानसरे, रॅग्लर डी. सी. पावटे, नागनाथअण्णा नायकवडी, यशवंतराव मोहिते, यांच्या प्रतिमाही होत्या. निरांधारांना आश्रम काढणारे, महाराष्ट्राचा उद्धारक रयतेचा लोकराजा, पददलितांचा कैवारी, श्रमिकांचा मुक्तीदाता, पाळणाघराची निर्मिती करणारे, कलाकारांचा आश्रयदाता, पैलवानाचा पोशिंदा, सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ या शाहू विचारांचे फलक पदयात्रेत ठळकपणे दिसत होते. पदयात्रेत छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचा जयघोष करण्यात आला. टाउन हॉल नर्सरी बागेत पदयात्रा विसर्जित करण्यात आली.