+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustडी वाय पाटील फार्मसी मध्ये* *‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन* adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव. adjust*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा* *डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ adjustजनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा मंत्री हसन मुश्रीफ adjustशाहूप्रेमींच्या साक्षीने अभिवादन adjustछत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा काढला हा अपमान नाही काय? : राजेश क्षीरसागर adjustशाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरचे समतावादी विचार सिद्ध करा adjustशेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी शाहू महाराजच खासदार आवश्यक : आ. पी. एन. पाटील
schedule29 Apr 24 person by visibility 39 category

युवराज राजीगरे-चुयेकर- 
नागपूर-कवी शंकर घोरसे यांच्या 'बा स्वातंत्र्या!' कवितासंग्रहाचा इंग्रजीत भावानुवाद केलेल्या 'O, Freedom..! ह्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा १ मे रोजी दु.१२.०० वाजता धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर येथे संपन्न होत आहे.  
          धनवटे नॅशनल कॉलेज (भाषा विभाग), अक्षरक्रांती फाऊंडेशन व ज्ञानपथ प्रकाशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित होत असलेल्या 'O, Freedom..! च्या प्रकाशन सोहळ्याला सुप्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ समीक्षक व रा.तु.म. नागपूर विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे हे अध्यक्षस्थानी राहणार असून धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख हे प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटक असतील. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिका मा. नेहा भांडारकर उपस्थित राहतील तर संग्रहाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिणारे तसेच इंग्रजी व मराठी भाषाशास्त्राचे अभ्यासक डॉ. कृष्णा साकुळकर हे संग्रहावर भाष्य करणार आहेत.
       नाशिक येथील सुप्रसिध्द साहित्यिक मा. प्रा. राजेश्वर शेळके यांनी कवी मा. शंकर घोरसे यांच्या 'बा स्वातंत्र्या! या काव्यसंग्रहाचा इंग्रजीत 'O, Freedom..! असा अनुवाद केला असून सुप्रसिद्ध कवी व समीक्षक मा. प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त' यांनी मर्मग्राही पाठराखण केली आहे. दूरदर्शन व नागपूर आकाशवाणीच्या सुप्रसिद्ध निवेदिका व रंगकर्मी मा. रुपालीताई मोरे-कोंडेवार कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणार आहेत.  
          प्रकाशन सोहळ्यासाठी धनवटे नॅशनल कॉलेजच्या मराठी विभागाच्या डॉ. पद्मिनी घोसेकर, सौ. हेमलता पुरी तसेच संग्रहाची सर्वांगसुंदर निर्मिती करणारे ज्ञानपथ पब्लिकेशन्सचे मा. सचिन सुकलकर, मा. सुशील सुकलकर, अक्षरक्रांती फाऊंडेशनचे उपाध्यक्ष- मा. गणेश भाकरे, सचिव- देवेंद्र काटे, सदस्य- लीलाधर दवंडे, वंदना घोरसे, मनीषा काटे अथक प्रयत्न करीत आहेत. प्रकाशन सोहळ्याला परिसरातील अधिकाधिक साहित्यिक मंडळींनी व रसिकांनी उपस्थित राहावे; असे आवाहन कवी मा. शंकर घोरसे यांनी केले आहे.