+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शन संघटनेच्या वतीने १४ जून रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन adjustसेनापती कापशीतील ५६६ घरकुलांना तातडीने प्रॉपर्टी कार्ड द्या* adjustशक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती* adjustपरदेश शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी 12 जुलै पर्यंत अर्ज सादर करावेत adjustनिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन अदालतीचे आयोजन adjustडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पार्थ पाटीलला* *ब्रिटिश विद्यापीठाकडून 100% शिष्यवृत्ती* adjustरिमझिम गिरे सावन....' ने कार्यक्रमाची उंची वाढवली adjustडी वाय पाटील अभियांत्रिकीचा* *इगलट्रोनिक्स एव्हिएशन सोबत सामजस्य करार adjustडॉ. बापूजी साळुंखे अभियांत्रिकी महावि‌द्यालयात विविध शिष्यवृत्ती योजना जाहीर adjustआवड आणि क्षमता लक्षात घेऊन योग्य करिअर निवडा*
schedule31 Jan 23 person by visibility 255 categoryक्रीडा
डॉ. चेतन नरके यांच्या प्रयत्नांना यश. राज्यातील दूध उत्पादकांना मोठा दिलासा 

मुंबई: राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्याकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध राज्यस्तरीय तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत योजना मधील प्रति दुधाळ जनावराच्या खरेदी किंमतीत वाढ करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
यापूर्वी कोल्हापूर, सातारा, सातारा, सोलापूर,नगर आणि पुणे या महाराष्ट्रातील प्रमुख दूध उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यातील दूध उत्पादक नाविन्यपूर्ण योजनेपासून वंचित होते. तसेच शिवाय प्रती जनावर मिळणारी रक्कम देखील कमी होती. यासाठी डॉ. चेतन नरके यांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन शासन आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. पशुसंवर्धन विभागाच्या योजना सर्व राज्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात लागू करण्याचे महत्व तसेच अनुदानात वाढ केल्याने त्याच्या महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायावर होणारा सकारात्मक परिणामाविषयी आपले अभ्यासपूर्ण मत सातत्याने विविध व्यासपिठावरून मांडले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. 
प्रति दुधाळ देशी संकरित गायीची किंमत रुपये 40 हजार ऐवजी रुपये 70 हजार तर प्रति म्हैशीची किंमत ४० हजार ऐवजी ८० हजार आणि मराठवाडा पॅकेज अंतर्गत प्रति देशी संकरित गायीची किंमत रुपये ५१ हजार ऐवजी रुपये ७० हजार व प्रति म्हशीची किंमत रुपये ६१ हजार ऐवजी रुपये ८० हजार यानुसार लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण जनजाती क्षेत्र उपयोजनेअंतर्गत ६ किंवा ४ किंवा २ दुधाळ जनावरांच्या गटाऐवजी निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांना केवळ २ दुधाळ देशी किंवा संकरित गाई किंवा म्हशींच्या गटाचे वाटप करण्याचा आणि राज्यातील ग्रामीण भागात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण जनजाती क्षेत्र उपयोजना ही योजना राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आली
आजच्या या निर्णयाने राज्यातील सर्व स्तरातील दूध उत्पादकांना लाभ मिळणार आहे.