
कोल्हापूर (प्रशांत चुयेकर)
पर्यावरणाचे संरक्षण करावे म्हणून निसर्गप्रेमी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. निसर्ग वाचवत असताना निसर्गावर कुराड मारणाऱ्यावर कारवाई करावी, वृक्षतोड थांबावी असा उद्देश बाळगून पर्यावरणवादी प्रयत्न करत असतात मात्र गेली महिनाभर वृक्षतोड करणार्यावर कारवाई करावी म्हणून पाटलाग करूनही कारवाई झालेली नाही; त्यामुळे वृक्षतोड करणारे जोमात संरक्षण करणारा मात्र कोमात अशी काहीशी परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यात झाली आहे.
मौजे ऐनी (ता.राधानगरी) येथील सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून 33 कोटी वृक्ष लागवड या कार्यक्रमातून वृक्षारोपण केले होते. तळेवाडी कॅनॉल पूल ते मौजे ऐणी येथे वनक्षेत्र वनअधिकारी राधानगरी विभाग यांच्यामार्फत 88 वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या तोडण्यास ठेकेदारास परवानगी दिली होती. संबधित ठेकेदाराने फांद्या तोडण्याऐवजी अंदाजे 80 ते 90 झाडे संपूर्ण मुळापासून तोडली आहेत. हे पर्यावरणाची खूप मोठे नुकसान मुद्दाम हून केले आह.
वृक्षतोड करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी यासाठी स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई,परिक्षेत्र वनअधिकारी राधानगरी एस. बी. बिराजदार, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग कार्यकारी अभियंता तुषार बुरुड यांना निवेदन दिले होते. तरी आद्यप कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून आले नाही.
माजगावकर या गोष्टीचा पूर्ण छडा लागून मुख्य सुत्रधारापासून शेवटच्या कामगारां पर्यंत चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई करावी यासाठी गेले एक महिनाभर पाठपुरावा करत आहेत.
सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग किंवा वन अधिकारी दोषींवर इतके मेहरबान का? दोषींवर अजून साधा गुन्हा नोंद नाही. ते गुन्हा नोंद करतात की नाही हे पाहण्याची गरज वाटू लागली आहे.आता जिल्हाधिकारी देसाई यांनी या विभागाकडून अहवाल मागवून दोषींवर कारवाई करावी अशी चर्चा ग्रामस्थांतून होत आहे.