Awaj India
Register
Breaking : bolt
*विकासकामांच्या जोरावर दक्षिणेत विजय निश्चित; आमदार ऋतुराज पाटीलधनंजय महाडिक यांच्या पुत्र प्रेमामुळे सत्यजित कदम शिवसेनेतआमदार सतेज पाटील काँग्रेसचे स्टार प्रचारकगोकुळ’ मध्‍ये वसुबारस निमित्‍त म्हैस व गाय-वासराचे पूजन उत्‍साहातकाँग्रेसने निष्ठावंतांना उमेदवारी का दिली नाही ; राजेश क्षीरसागरसत्यजित कदम, कृष्णराज महाडिक करणार राजेश क्षीरसागर यांचा प्रचारअमल महाडिक यांच्यानंतर दोन महाडिक बंधूंची उमेदवारीसाठी तयारी...तर राजेश क्षीरसागरांचा प्रचारक मी असेन; धनंजय महाडिकगतवेळपेक्षा जास्त मतदान घेत विधानसभा जिंकणार; ऋतुराज पाटीलगतवेळपेक्षा जास्त मतदान घेत विधानसभा जिंकणार; ऋतुराज पाटील

मिलेट महोत्सवाचे व्ही.टी. पाटील स्मृतीभवन येथे शनिवार पासून आयोजन

schedule22 Feb 24 person by visibility 92 category



कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पने अंतर्गत विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय व नाबार्ड महाराष्ट्र क्षेत्रिय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 24 ते 27 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत ‘मिलेट महोत्सव-2024’ चे ‘व्ही.टी.पाटील स्मृतीभवन, राजारामपुरी येथे आयोजन करण्यात आले आहे. या मिलेट महोत्सवाचे उद्धघाटन शनिवार दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते होणार आहे. 
 या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरिक्षक सुनिल फुलारी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील ,पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, नाबार्डचे सरव्यवस्थापक प्रदिप पराते, विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा उपनिबंध निळकंठ करे, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भिंगार दिवे, जिल्हा परिषदचे अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अजयकुमार माने हेउपस्थित राहणार आहेत.
विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करुन शेतक-यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा या महोत्सवांचा प्रमुख उद्देश आहे. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून जाहिर केलेले आहे. या निमित्ताने देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषक तत्वामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे.
महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागातून तृण धान्य उत्पादक, तृण धान्य प्रक्रिये मध्ये काम करणारे बचतगट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या सहभागी होणार आहेत. महोत्सवा मध्ये 45 स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असुन, ग्राहकांना अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्राही तृणधान्ये व या पासुन तयार करण्यात आलेला ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, रागीचा डोसा मिक्स इत्यादी नाविण्यपूर्ण अशी असंख्य प्रकारची उत्पादने थेट उत्पादकांकडून विक्री साठी उपलब्धअसणार आहेत. मिलेट महोत्सवा मध्ये दि. 24 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत मिलेट उत्पादन,मुल्यवर्धीत प्रक्रिया उत्पादने, आरोग्य विषयक महत्व या विषयी नामांकित तज्ञांचे मार्गदर्शन पर व्याख्याने, मिलेट आधारित महिलांसाठी पाककृति स्पर्धा, खरेदीदार-विक्रेते संमेलन असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास करवीरवासियांनी उपस्थित राहुन मिलेट महोत्सवास भेट द्यावी असे आवाहन कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ.सुभाष घुले व नाबार्डचेउ पसरव्यवस्थापक अशुतोष जाधव यांनी केले आहे.
00000
Copyright © 2024. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes