+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...!
schedule20 Mar 24 person by visibility 46 category
 गोकुळच्या प्रगती मध्ये दूध संस्था व संस्था कर्मचारी यांचे मोलाचे योगदान- 
 अरुण डोंगळे चेअरमन गोकुळ दुध संघ

 व्यवस्थापन खर्चात वाढ केल्याबद्दल दूध संस्था कर्मचारी संघटनेमार्फत गोकुळचे चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार

कोल्हापूर ता.२०: गोकुळ दूध संघाशी संलग्न प्राथमिक दूध संस्था कर्मचारी संघटनेमार्फत जिल्ह्यातील १ एप्रिल २०२४ पासून गोकुळ सलंग्न प्राथमिक दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये प्रतिलिटर १० पैसे व संस्था कर्मचारी यांना प्रोत्साहन पर रक्कमेत प्रतिलिटर ५ पैसे (वार्षिक १० ते ११ कोटी रुपये) वाढीचा निर्णय संचालक मंडळाने घेतले बद्दल गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व जेष्ठ संचालक विश्वास पाटील तसेच उपस्थित संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, शामराव पाटील, विश्वास पाटील यांच्या हस्ते व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या ताराबाई पार्क, कार्यालय येथे करण्यात आला.

          यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्था व दूध संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी वर्ग यांचा गोकुळच्या प्रगती मध्ये मोलाचे योगदान आहे. हिरक महोत्सवी वर्षानिमित्त गोकुळ संबंधित सर्व घटकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात संघाच्या विविध योजनांची माहिती दूध उत्पादकापर्यंत पोहोचवून संघाच्या दूध वाढीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले.      

       यावेळी संघटनेच्या वतीने दूध संस्था कर्मचारी प्रोत्साहन रकमेत प्रति लिटर पाच पैसे अजून वाढ करनें संबंधी तसेच कामकाजातील अडीअडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली.गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील यांनी केले. तर आभार संघटनेचे सेक्रेटरी विश्वास पाटील यांनी केले.

          यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके, संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, उपाध्यक्ष शामराव पाटील, सेक्रेटरी विश्वास पाटील, सुरेश जाधव, तानाजी गुरव, सरदार देसाई, संजय पानारी, मंगेश बेडकळ,रामचंद्र चौगले, शिवाजी शिंदे, सूनिल विभूते,रमेश पाटील, संजय हाळदकर,आबासो पाटील, दिनकर कोतेकर, मोहन धुंदरे, शिवाजी गायकवाड व संघटनेचे कर्मचारी उपस्थित होते.