टाकाऊ पदार्थांपासून बनवलेला* *इलेक्ट्रिक स्क्रू ड्रायवरला प्रथम क्रमांक*
schedule06 Dec 22 person by visibility 204 categoryशैक्षणिक
-बेस्ट आउट ऑफ वेस्ट स्पर्धा,
- डी. वाय. पाटील आभियांत्रिकीत आयोजन
कसबा बावडा/ वार्ताहर
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या मॅकेनिकल इंजीनिअरिंग विभागातर्फे आयोजित करण्यात ‘बेस्ट आउट ऑफ वेस्ट’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध उपकरणानी परीक्षकांची मने जिंकली. दैनदीन वापरतील टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या इलेक्ट्रिक स्क्रू ड्रायवरला या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. फ्लोअर क्लीनर, मिसाईल लॉन्चर व्हेईकल आणि रिव्हर क्लीनर बोट या उपकरणांना या स्पर्धेत अनुक्रमे दुसऱ्या ते चौथ्या क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
महाविद्यालयाच्या ‘वेस्ट टू बेस्ट’ स्टुडट क्लबच्यावतीने १ डिसेंबर रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुनर्वापर करता येणाऱ्या कचऱ्यापासून सर्वोत्तम उपकरण बनवणे, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणे व या माध्यमातून पर्यावरणाबाबत प्रेम- जागरूकता निर्माण करणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता. या स्पर्धेत १४ गटामध्ये ७८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अभियांत्रिकी कौशल्याधारित विविध नाविन्यपूर्ण उपकरणे विद्यार्थ्यानी तयार केली. यामध्ये थ्री डी होलोग्राम पॉइंटर, पोर्टेबल एसी, रोबो, हायब्रीड ब्रीज आशी अनेक उपयुक उपकरणे टाकाऊ कचऱ्यापासून तयार करण्यात आली.
मॅकेनिकल इंजीनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. सुनील रायकर यांच्या कल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी डॉ. राजेंद्र रायकर, समन्वयक योगेश चौगुले, दीपक सावंत, विराज पसारे यांच्यासह विद्यार्थी समन्वयक साईराज भिसे, सौरभ पेंढारी, प्रतिक चोडणकर, मधुमती देसाई, श्वेता जाधव यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
कसबा बावडा: विजेत्यांना गौरवताना डॉ. सुनील रायकर. सोबत योगेश चौगुले, दीपक सावंत, विराज पसारे, संतोष आळवेकर आदी.