नाल्यांना अडथळा ठरणा-या अनाधिकृत बांधकामावर महानगरपालिकेची कारवाई.
schedule10 Jun 22 person by visibility 115 categoryगुन्हे
पावसाळ्यापुर्वी नाल्यांना अडथळा ठरणा-या चार अनाधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करून ती काढण्यात आली.
यामध्ये सम्राटनगर येथील नाल्यामध्ये असणारे अनाधिकृत बांधकाम, गुंजन पॅराडाईज अपार्टमेंटच्या ओढ्यामध्ये बांधलेली रिटेनिंग वाॅल, मंडलिक वसाहत येथील नाल्यावरील अनाधिकृत पूल व याबरोबरच गोखले काॅलेज जवळील नाल्यावर स्लॅब टाकून उभा केलेल्या टप-यांवर ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई महानगरपालिकेच्या नगरचना व विभागीय कार्यालयाच्या वतीने करण्यात आली.