Awaj India
Register
Breaking : bolt
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरावह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवसव्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवडट्रिपलसीट व एकेरी मार्ग उल्लंघनावर दोन लाख रुपयांचा दंड वसूल भारत गौरव पर्यटन ट्रेन’चे कोल्हापूरात आगमन*सतेज पाटील यांच्या वाढदिवसाचे दातृत्व; गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचे कर्तुत्व वाडीपीर येथील जलजीवन मिशन; कोणी खाल्ले जास्त कमिशन

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती

schedule31 May 25 person by visibility 117 categoryगुन्हे

*गोपनीय माहिती देणाऱ्यांसाठी बक्षीस योजना – जिल्हाधिकारी अमोल येडगे*

*कोल्हापूर, दि. 30 मे* : जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला व्यापक गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची (NCORD) बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात संपन्न झाली. बैठकीत अंमली पदार्थ नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात आला.  

बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी धीरजकुमार,  राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, पोलिस विभाग, महिला व बाल विकास विभाग, अन्न व औषध प्रशासन, औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा माहिती अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांसह विविध सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचनेनुसार अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला अधिक प्रभावी बनवण्यासाठी जिल्ह्यात गोपनीय माहिती देणाऱ्यांसाठी बक्षीस योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेंतर्गत नागरिकांनी पोलीस किंवा संबंधित यंत्रणांना अंमली पदार्थ संबंधित माहिती पुरवावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

अंमली पदार्थांविरोधात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विशेष मोहिम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षकांनी पालकांच्या सहभागातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे तसेच वसतीगृहांमध्ये विद्यार्थ्यांची तपासणी करावी. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून शाळांच्या कामकाजाचा याबाबत आढावा घेण्यात येणार आहे.

*जनजागृतीसाठी सर्वव्यापी माध्यमांचा उपयोग* – शहरी व ग्रामीण भागांमध्ये होर्डिंग, एलईडी स्क्रीन, रेल्वे स्थानक, एसटी स्टँड यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी संदेश प्रसारित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय सिनेमागृहांमधून देखील जनजागृतीसाठी आवाहन करण्यात येणार आहे.

मागील महिन्यात पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी 61 कारवाया केल्या असून यामध्ये 17 पुरवठादार आहेत तर उर्वरित सेवन करताना आढळून आले आहेत. ग्रामीण भागांमध्येही कामगार वर्गात अंमली पदार्थ प्रकरणे उघडकीस येत असल्याने पोलीस पाटलांनाही जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक गावाला गांजा मुक्त गाव घोषित करण्यासाठी पोलीस पाटील सक्रिय राहणार आहेत.

बाहेरून जिल्ह्यात येणारे अंमली पदार्थ रोखण्यासाठी सीमाभाग, रेल्वे स्थानके व औद्योगिक क्षेत्रांवर तपासणीत वाढ करण्यात येणार आहे. संशयित ठिकाणी छापे मारून कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांना विशेष निर्देश देण्यात आले आहेत.

*अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य*:  26 जून रोजी होणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर एक विशेष जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये युवकांचा सहभाग नोंदवण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत दिलेल्या सूचनांमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला निश्चितच नवीन दिशा व गती मिळणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes