Awaj India
Register
Breaking : bolt
शिवाजी भिमाजी परळीकर यांना संविधान प्रसारक आदर्श मूकनायक पुरस्कारचंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ व श्री शिवाजी तरुण मंडळ विजयीमच्छिंद्र कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कारप्रा. प्रमोद झावरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कारडॉ. भाग्यश्री मल्लिकार्जुन पाटील यांना आदर्श शिक्षिका पुरस्कारआरती वैशाली मनोहर कांबळे यांना मूकनायक पुरस्कार कोल्हापूरकोल्हापूर मेडिकल असोसिएशन तर्फे व्यसनमुक्ती अभियानसागर कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कारप्रा. जितेंद्र भारमगोंडा यांना आदर्श शिक्षक पुरस्कारगायक नामदेव हसुरकर यांना आदर्श मूकनायक पुरस्कार

जाहिरात

 

डिनर डेटसाठी सोळा लाख

schedule26 Sep 20 person by visibility 1065 categoryसंपादकीय

डिनर डेटसाठी सोळा लाख
डिनर डेटसाठी जास्त बोली लावेल त्याचेबरोबर मी डेट करेन.
बोलीचे पैसे करोना लढ्यासाठी चॅरीटी करणारी तरूण टेनिसपटू युजनी बूचार्ड साठी लागली सोळा लाखाची बोली
करोनाने जगभरात थैमान घातले आहे. कॅनडासुद्धा त्याला अपवाद ठरलेला नाही.युजनी बूचार्ड ही कॅनडाची सौंदर्यवती व लोकप्रिय टेनीसपटू
जगभरातील विविध क्रीडास्पर्धा करोनाच्या महामारीमुळे रद्द झाल्या आहेत.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या कुटूंबासमवेत वेळ घालवत आहेत. युजनी बूचार्ड हिने करोना विरोधातील लढ्यासाठी मदत द्यायची म्हणून हटके पाऊल उचलले आहे
युजनी बूचार्डनं इंस्टाग्रामला निधी जमा करण्यासाठी एक व्हिडीअो शेअर केला.सर्वाधिक बोली लावणाऱ्या चाहत्यासोबत डिनर डेटला येणार असून ,बोलीचे पैसे करोना लढ्यासाठी चॅरिटी करणार आहे. करोना लढ्यासाठी मदत निधीची गरज म्हणून हे करणार आहे
युजनी ने इंस्टाग्रामवर दिलेल्या ऑफरला सर्व वयातील लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.बोली लावायला सुरवात केली. सर्वाधिक बोली सोळा लाखाची लागली.युजनीने सर्व सोळा लाख रूपये चॅरिटी केले
युजनीची टेनिस मधील सध्याची रँकिंग ३१२वी असून तिने २०१४ मध्ये विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा पराक्रम केला होता
आपले क्रीडा नैपुण्य व सौंदर्य याचा उपयोग समाजकार्यासाठी करण्याचे ठरवून हटके पाऊल उचलले व देशासाठी करोना विरोधात लढण्यासाठी मदत निधी उभा केला.युजनीला समाज काय म्हणेल, आपली प्रतिष्ठा जाईल की कमी होईल याची जराही चिंता न वाटता तिने हे धाडशी पाऊल समाजसेवेसाठी उचलेले
करोनाच्या संकटकाळात संवेदनशील लोक देशाच्या,राज्यांच्या मदतीसाठी पुढे येत असताना युजनीने हे उचललेले असांस्कृतिक पाऊल असले तरी,त्यामध्ये समाजहितच दडले असल्याचे दिसते. युजनिने समाजास मदत मिळवून देण्यासाठी उचललेले पाऊल कॅनडाच्या लोकांच्या कौतुकाचा विषय बनला आहे. युजनीच्या या कृतीचा लोकांना अभिमानच वाटत आहे
प्रचंड पैसे मिळविणे,ऐश करण्यासाठी अनेक सौंदर्यवती डेटवर जात असताना युजनीने देशासाठी उचललेले पाऊल सलाम करणारेच आहे. युजनी तुझ्याकडील मानवतेला व समजसेवेला सस्नेह वंदन
-संपत गायकवाड-(माजी सहा. शिक्षण संचालक)

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes