सारिका पाटील यांना आदर्श महिला पुरस्कार
schedule05 Mar 25 person by visibility 368 categoryराजकीय
कोल्हापूर;
सारिका पाटील यांना कृती फाउंडेशन यांच्यावतीने यावर्षीचा 'आदर्श महिला पुरस्कार' जाहीर करण्यात आला. ८ मार्च रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक, कोल्हापूर येथे सायंकाळी पाच वाजता पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
पाटील यांनी जाणीव बहुउद्देशीय विकास संस्था मळगे सह परिसरातील महिलांना जागृतीचे काम केले. आशा गटप्रवर्तक म्हणून काम करत असताना आरोग्य सेवेत सुद्धा त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. शिवणकाम, फॅशन डिझाईन, कापडी बॅगा या कोर्सचे प्रशिक्षण देत बचत गट महिला मेळावा आदी कामात त्या कायमच अग्रेसर राहिलेला आहे. दारूबंदीसाठी त्यांनी विशेष कार्य केलेले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.