वंचित बहुजन आघाडीच्या करवीर तालुकाध्यक्षपदी नितीन कांबळे
schedule19 Aug 25 person by visibility 84 categoryराजकीय

कोल्हापूर:
*तालुका कार्यकारणी घोषित 30 पदाधिकाऱ्यांचा समावेश*
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांच्या सही ने तसेच डॉ.क्रांतीताई सावंत राष्ट्रीय उपाध्यक्ष, सोमनाथ साळुंखे राज्य उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड यांच्या नेतृत्व खाली करवीर तालुका कार्यकारणी निवड घोषित करण्यात आली असून तालुका अध्यक्षपदी नितीन कृष्णात कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
करवीर तालुकाध्यक्ष नितीन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 30 पदाधिकाऱ्यांचीकार्यकारणी निवड करण्यात आली आहे नितीन कांबळे हे धडाडीचे युवा कार्यकर्ते म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या मध्ये सक्रिय आहेत . अनेक कार्यक्रमाच्या, आंदोलनाच्या व सामाजिक कार्यातून वंचित आघाडीचा अजेंडा लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे व करत आहेत. संघटनात्मक बांधणी करीत पक्ष बळकटीचे काम केले आहे त्यांची तालुक्यात क्रेझ आहे. त्यांच्यातील नेतृत्व गुण हेरून पक्षाने त्यांच्यावरती तालुका अध्यक्षपदाचे जबाबदारी सोपवली आहे .त्यांच्या या निवडीने करवीर तालुक्यामध्ये वंचित आघाडीला उभारी मिळणार असून त्यांच्या निवडीचे सर्व वर्गातून कौतुक व स्वागत होत आहे.
*करवीर तालुका कार्यकारणी*
*महासचिव* - संतोष पवार
*उपाध्यक्ष* -ज्योतीताई थोरात, सचिन कांबळे ,भारत कांबळे, पोपट जगधने, सिद्धार्थ कांबळे, निलेश कांबळे, प्रतिक कांबळे, समीर देशमुख, समीर कांबळे, सुमित कांबळे,रोहित कांबळे, आरिफ मुल्लाणी, सुरज सादळेकर
*सचिव* विनायक भोसले ,संग्राम कांबळे, रोहित सोरटे, अक्षय मोहित, विकास कांबळे.
*संघटक* विभा सावंत, प्राजक्ता कांबळे, रतन कांबळे ,यासीन मुल्ला, बाबासो खोपाळे, औदुंबर बेलेकर ,आकाश यादव, सुधीर कांबळे, रोहित खाडे, रोहन कांबळे, दिलीप जाधव.