Awaj India
Register
Breaking : bolt
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून ‘गोकुळ’शी ऋणानुबंध कायम ठेवावा - नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा* *‘ब्रह्माकुमारी’ सोबत सामंजस्य करार*आर्किटेक्चर नंतर करिअरच्या* *अमर्याद संधी - डॉ. ए. के. गुप्ता*नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार**डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरा

जाहिरात

 

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून ‘गोकुळ’शी ऋणानुबंध कायम ठेवावा - नविद मुश्रीफ

schedule16 Jul 25 person by visibility 24 categoryउद्योग

गोकुळ तर्फे ४० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार
 
कोल्हापूर  : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघ सेवेतून सेवानिवृत्त झालेबद्दल ४० कर्मचाऱ्यांचा सत्कार संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ व सर्व संचालक मंडळ यांच्या हस्‍ते संघाच्‍या प्रधान कार्यालय, गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला. यावेळी संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थिती होते.
 
          या कार्यक्रमात बोलताना गोकुळचे चेअरमन नविन मुश्रीफ म्हणाले, गोकुळच्या प्रगतीसाठी कर्मचारी यांनी आपल्या संघ सेवेतून मोलाचे योगदान दिलं आहे. आपल्या अनुभवातून वेळोवेळी संघाचे नुकसान टाळले आणि कठीण प्रसंगी योग्य दिशा दाखवली. त्यांची शिस्त, सचोटी आणि संघाशी असलेली नाळ ही सध्याच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. सेवानिवृत्तीनंतरही गोकुळशी असलेलं नातं तुटत नाही, उलट ते अधिक भावनिक आणि बंधुत्वाचं होतं. त्यामुळे सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या गावात, कुटुंबात किंवा वैयक्तिक पातळीवर दुग्ध व्यवसायाशी नातं टिकवून ठेवावं. गोकुळशी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून संपर्कात राहणं ही केवळ निष्ठा नव्हे, तर संस्थेच्या वाटचालीत आपलं योगदान सतत जपण्याचा एक मार्ग आहे.
 
          यावेळी कुस्तीपटू प्रथमेश सुर्यकांत पाटील, रा. बानगे ता. कागल किर्गीस्थान येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल तसेच कु. हर्षवर्धन अजित माळी, रा. म्हाकवे ता. कागल यांनी नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक व किर्गीस्थान येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत निवड झालेबद्दल त्यांचा संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करणेत आला.
 
या सेवानिवृत्‍त कर्मचा-यांमध्‍ये माणिक डवरी, सर्जेराव पाटील, रामचंद्र चव्हाण, कोंडीबा पाटील, रंगराव चौगुले, रघुनाथ चौगुले, आनंदा स्वामी, सातापा पारळे, आकाराम पाटील, संभाजी पाटील, सुखदेव सुळकुडे, राजाराम पाटील, चंद्रशेखर घाळी, गजानन मुचंडी, जयवंत पाटील, भागोजी दळवी, अशोक परीट, बाजीराव कणसे त्याचबरोबर इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना श्रीफळ, गोकुळचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
 
          याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी तसेच सेवानिवृत्‍त कर्मचारी उपस्थित होते.
 
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes