Awaj India
Register
Breaking : bolt
अंतरंग हॉस्पिटलचा तत्पर प्रतिसाद: अपोलो हॉस्पिटलची आणखी एक यशोगाथाभारतीय बौध्द महासभेच्या वतीने डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ सप्टेंबरला जाहीर स*आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या शिवीगाळीप्रकरणी आरती आंबी पुणे कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार...* *डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला* *‘रोटरी’ कडून अत्याधुनिक नेफ्रोकेअर उपकरणे**बालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड* *आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन*जिल्ह्यातील ३१ आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ९० सराईत गुन्हेगारांना कडक सूचनासंविधान साक्षर शाळेच्या उपक्रमातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यासआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रा. तुळशीदास हरी कांबळे यांची निवडडॉ. दत्तात्रय केरबा कांबळे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर

जाहिरात

 

*सहकार उपनिबंधकांकडून अवसायनातील २९८ दूध संस्थाही गोकुळच्या मतदानास पात्र

schedule17 Aug 26 person by visibility 200 categoryराजकीय

छोट्या दूध संस्थांचा जिद्द आणि चिकाटीचा न्यायालयीन लढा यशस्वी*
      
*अदृश्य शक्तीला पुन्हा एकदा मोठी चपराक*
                
कोल्हापूर, दि. १८:
सहनिबंधक- दुग्ध श्री. कृष्णा ठाकरे यांनी अवसायनात काढलेल्या संस्थांपैकी २९८ संस्थांचे अपील विभागीय उपनिबंधक तथा जिल्हा निवडणूक दुग्ध अधिकारी देविदास मिसाळ यांनी मंजूर केले. त्यामुळे अवसायनात काढलेल्या दूध संस्थेच्या मतदानाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. छोट्या दूध संस्थांचा जिद्द आणि चिकाटीचा न्यायालयीन लढा यशस्वी झाला. न्यायालयीन लढाईतील या यशामुळे छोट्या दूध संस्थांना अवसायनात काढण्यासाठी खटाटोप करणाऱ्या अदृश्य शक्तीला पुन्हा एकदा मोठी चपराक बसली आहे. 
          
याबाबत अधिक माहिती अशी, विभागीय उपनिबंधक श्री. मिसाळ यांच्याकडे महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार अपील दाखल केले होते. या अपिलांची सुनावणी पुण्यात शुक्रवारी दि. १४ पार पडली होती व हा निकाल राखीव राखून ठेवण्यात आला होता. सोमवारी दि. १७  त्याचा निकाल देण्यात आला. सुनावणीअंती सर्व २९८ संस्थांची अपिले मंजूर करण्यात आली. सहाय्यक निबंधक दुग्ध श्री.  कृष्णा ठाकरे यांनी दिलेले अवसायनाचे आदेश बेकायदेशीर ठरवून रद्दबातल करण्यात आले आहेत. नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार संस्थांना बाजू मांडण्याची संधी न दिल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने जे निष्कर्ष नोंदवले होते.  ते सर्वच निष्कर्ष ग्राह्य धरून श्री. देविदास मिसाळ यांनी हे आदेश पारित केले आहेत.
​          
या निकालामुळे पावसाळ्यात काढलेल्या सर्व संस्थांचा मतदानाचा मार्ग आता मोकळा झाला असून संस्थांवर केलेली कारवाई बेकायदेशीर होती, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
​या प्रकरणात संस्थांच्यावतीने अ‍ॅड. प्रबोध पाटील, अ‍ॅड. के. डी. पवार आणि अ‍ॅड. योगेश शहा यांनी बाजू मांडली.
         
*ही तर नागराजाची कृपा......!* 
याबाबत विकास पाटील- कुरूकलीकर म्हणाले, आज नागपंचमीचा सण. बळीराजा आणि नागाराजाचे नाते पिढ्यानपिढ्याचे आहे  या निकालाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळालेला हा न्याय, ही जर नागराजाचीच कृपा आहे.... .!

 कष्टाने उभा राहिलेल्या संस्थेला 
 गावाकडच्या गोरगरीब लोकांनी कष्टाने उभा केलेल्या दूध संस्थेला अखेर न्याय मिळाला आहे. त्यांना आता सभासत्व पात्र झाले असून मतदान करायला  सुद्धा संधी मिळणार आहे.
 बाबासाहेब पाटील  (आसुर्लेकर)
 जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes