Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पी. साळोखेनगर मध्ये रविवारी "सतेज मॅथ्स स्कॉलर" परीक्षेचे आयोजन*डी.वाय. पाटील च्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट चुये येथे आज पासून श्री दत्त जयंती सोहळा महापुरुषांचे विचार शालेय अभ्यासक्रमात असावेत : कौस्तुभ गावडे कर्तृत्ववान मुख्याध्यापिका सौ. सुहासिनी उदय कदम यांचा प्रेरणादायी प्रवासआदर्श व्यक्तिमत्व मुख्याध्यापक आत्माराम विश्वनाथ सोनोने धनश्री मोहिते विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाची उज्ज्वल परंपरा आदर्श शिक्षक जनार्दन मधुकर कांबळे सर : विद्यार्थ्यांच्या घडवणुकीसाठी समर्पित कार्यशैलजा पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी सुनंदा प्रकाश मुसळे : सेवेतून आदर्श घडवणाऱ्या शिक्षिका

जाहिरात

 

शेतकऱ्यांसाठी परराज्याचा अभ्यास दौरा* *10 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत*

schedule04 Jan 24 person by visibility 142 categoryराजकीय

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतंर्गत शेतक-यांसाठी राज्याबाहेरील अभ्यास दौरा राबविण्यात येत आहे. फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, शेडनेटगृह व हरितगृह उभारणी, फळप्रक्रिया इ. बाबत प्रशिक्षणासाठी सहभाग घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी दिनांक 10 जानेवारी 2024 पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा संबंधित उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याकडे सातबारा, 8 अ, आधार कार्ड व छायाचित्रासह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरुण भिंगारदेवे यांनी केले आहे.
दौ-यात फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, विदेशी फळपिक लागवड, आधुनिक तंत्रज्ञान जाणुन घेता येणार आहे. या कार्यक्रमांतंर्गत राज्यात फलोत्पादन शेतक-यांसाठी तसेच शेतक-यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतुने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी, शेत स्तरावर करावयाची प्रक्रिया, उद्योग स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेबाबतचा अभ्यास करणे, आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करुन देणे व या मध्यामातून शेतकऱ्यांनी स्वत:ची व त्याचबरोबर समुहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे यासाठी शेतक-यांचा राज्याबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. भिंगारदेवे यांनी दिली.
00000

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes