+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव. adjust*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा* *डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ adjustजनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा मंत्री हसन मुश्रीफ adjustशाहूप्रेमींच्या साक्षीने अभिवादन adjustछत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा काढला हा अपमान नाही काय? : राजेश क्षीरसागर adjustशाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरचे समतावादी विचार सिद्ध करा adjustशेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी शाहू महाराजच खासदार आवश्यक : आ. पी. एन. पाटील adjustसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ? : संभाजीराजे छत्रपती adjustसंजय मंडलिक विधानसभेला मुश्रीफ की समरजितराजे सोबत राहणार ?
schedule01 Oct 20 person by visibility 722 categoryसंपादकीय
संपत गायकवाड सर खूप अपवादाने असे अधिकारी आहेत की जे सेवानिवृत्त झाल्यानंतरही समाजासाठी व शिक्षण प्रक्रियेतील बदलासाठी माणुसकीच्या नात्याने कार्यरत असलेले दिसून येतात. कोल्हापूर जिल्ह्यात असाच एक अधिकारी सदाचारी विचारांची वाट धरून 'समाजाचं देणं' समजून कार्य करणाऱ्या विविध व्यक्तिमत्त्वांच्या माणुसकीवर शब्दांची अत्तरकुपी लावून त्यांना महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोचविण्याचे कार्य करताना दिसून येताे.

करोना प्रकोपाच्या काळात गरीब,गरजू व हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होताना बघून संवेदनशील असणाऱ्या संपत गायकवाड सरांनी ऑगष्ट मध्यें आपली एक महिन्याची पेन्शन ४२,७६७ रूपयांपैकी ४२,५०० रूपये पाच कुटुंबास ८,५०० रूपये प्रमाणे देऊन टाकली. संपत गायकवाड सर त्यांच्या शब्दातील भावनिकतेची जादू पुन्हा नव्या प्रेरणेने कार्य करण्यास उद्युक्त करत आहे.
त्यांनी व्हाट्सअप वर टाकलेली एक एक पोस्ट लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. त्यांनी आपल्यासाठी लिहिणं म्हणजे तो सर्वोच्च पुरस्कारा समान वाटतो. असे भावनिक, मातृहृदयी आणि संवेदनशील सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षण संचालक संपत गायकवाड सर
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने/ शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू //
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन /
शब्द वाटू धन जनलोका .
. संत तुकाराम महाराजांच्या या उक्तीनुसार ज्यांची वाणी आणि लेखणी सत्कार्याची ओळख करण्यासाठी नेहमीच आसुसलेली असते. दररोज सकाळी एका चांगल्या कार्याची आणि उत्तम व्यक्तिमत्त्वाची ओळख त्यांच्या लेखणीने होते. त्या व्यक्तीला एक नवं बळ मिळते आणि समाजाला हेही कळून चुकतं की अशी 'वेडी माणसं' .......अजूनही या जगात आहेत की जी बाबा आमटे,महात्मा फुले , मदर तेरेसा, सावित्रीबाई फुले आदी महान व्यक्तींच्या कार्याचा वारसा जोपासत आहेत. त्यामुळे गायकवाड सरांची एक एक पोस्ट चिंतन करायला भाग पाडते. माणुसकी अजून जिवंत आहे असं नेहमी सांगत राहते.
पण जी व्यक्ती दुसऱ्यांच्या बद्दल एवढी सुंदर लिहिते 'त्या व्यक्तीच जगणं किती सुंदर असेल' याचा विचार आपण कधी केला आहे का ? ......जी व्यक्ती ती सेवानिवृत्तीनंतरही 'आई समजून घेताना','बाप समजून घेताना', संस्कार,' पणत्यांचा प्रकाश , समाजभान या विषयावर हजारो व्याख्याने देत आहे. तेही कोणतेही मानधन न घेता..... असा मुलखावेगळा अधिकारी मला अनुभवायला मिळाला याचे भाग्य मी समजतो. त्यांचा सहवास म्हणजे अमृतानुभव असतो. जो नुसता ऐकतच रहावा असा वाटतो.
या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात आपण सर्वजण विचित्र आणि महाभयंकर परिस्थितीला सामोरे जात आहोत. एकीकडे कठीण परिस्थितीत स्वतःच्या नातलगांनींही पाठ फिरवल्याचे चित्र दिसत असताना नात्यागोत्याचे नसतानाही माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या शेकडो हातांचे दर्शन होताना दिसते आहे. हे माणुसकी दर्शन घडवण्यात गायकवाड सर महाराष्ट्रात अग्रेसर आहेत.
जी व्यक्ती ती दुसऱ्याचं एवढं तोंड भरून कौतुक करते, त्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यावसं प्रत्येकाला वाटतं.
"शिक्षक,शिक्षण विस्तार अधिकारी,गट शिक्षणाधिकारी,उपशिक्षणाधिकारी, व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी, डायटचे प्राचार्य ते सहायक शिक्षण संचालक" अशा विविध पदावर काम करत असताना 3Tचा अर्थात टाईम,तिकीट आणि टिफिन चा मंत्र त्यांनी आयुष्यभर जपला. वेळेवर जाणं, स्वतःच्या खर्चाने जाणं आणि स्वतःचा डबा सोबत घेऊन जाणं हे ते आयुष्यभर नोकरीत जपत राहिले. त्यामुळे एका वेगळ्या अधिकाऱ्याची ओळख सर्वांनाच झाली.
इयत्ता पहिली पासून शिष्यवृत्ती परीक्षा हा भुदरगड पॅटर्न त्यांनी महाराष्ट्रात एका वेगळ्या पद्धतीने पोहोचविला. हा एक अविश्वसनीय कार्यक्रम होता ज्याची आज सर्वत्र अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येते.
पण सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्या सुंदर कार्याचं वादळ घोंगावत राहिलं आहे. शेकडो व्यासपीठावरून आदर्श पालकत्व,संस्कार याविषयी व्याख्याने देत राहिले आहेत; पण आज वयोमानानुसार त्यांचे आजारपण अचानक डोकं वर काढते. आयुष्यात तीन वेळा मृत्यूच्या दारात जाऊन परत आलेला हा माणूस इतरांच्या भल्यासाठी नेहमी झटत असतो. फरक इतकाच आहे की आपल्या कार्याची प्रसिद्ध करण्याची त्यांना अजिबात हौस नाही . ..किंबहुना एखाद्याला मदत करताना फोटो काढण्याची लहर तर त्यांना अजिबातच नाही.
या कोरोनाच्या भीतीदायक वातावरणात त्यांना अनेक टेस्ट कराव्या लागल्या. हजारो रुपयांचा खर्च झाला.अचानक घटलेले वजन वाढवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. आज प्रकृती स्थिर आहे; पण आपल्या आजारपणासाठी प्रचंड खर्च झालेला असतानाही या अवलियाने त्यांना पेन्शन दान केली
ना कोणता कार्यक्रम ... .. ना फोटो सेशन /ओन्ली माणुसकीचे दर्शन//
एवढेच नव्हे तर दर महिन्याला त्यांना मिळणाऱ्या पेन्शन मधील पाच टक्के रक्कम ते वंचित,गरीब,अनाथ मुलांना व त्यांच्या कुटुंबीयांना देत असतात. त्यांच्या या दातृत्वाच्या हातांना कधीकधी साक्षीदार होता आले हे माझे भाग्य समजतो.
खरंतर पेन्शन म्हणजे म्हातारपणाची काठी म्हणतात ; पण स्वतः आजारी असतानाही आपल्या आजारपणाचा खर्च सुरू असतानाही स्वतःची पेन्शन गरजू कुटुंबांना देत त्यांना अल्पशी मदत करण्याची उमेद देणाऱ्या या अवलियाला मनापासून वंदन!
देणाऱ्याने देत जावे /
घेणाऱ्याने घेत जावे//
घेता घेता एक दिवस ..
दातृत्वाचे हात घ्यावेत//
आई अंबाबाई गायकवाड सरांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य देवो. त्यांचे कृपाशीर्वाद नेहमीच आमच्या शिरावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि विराम देतो.
धन्यवाद!
दिगंबर टिपुगडे
विषय शिक्षक विद्या मंदिर मोहडे चाफोडी ता:राधानगरी
अध्यक्ष : शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्था राशिवडे बुद्रुक 9421103271/ 9370091428.