अमर कदम यांना आदर्श उद्योजक पुरस्कार
schedule31 Mar 25 person by visibility 664 categoryउद्योग

कोल्हापूर;
कृती फाउंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने वंदूर (ता. कागल) येथील अमर कदम यांना आदर्श उद्योजक पुरस्कार जाहीर करण्यात आला. रविवारी (दि.6 एप्रिल) शाहू स्मारक भवन कोल्हापूर, येथे साडेचार वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये महाराष्ट्र बायो या नावाने एक व्यवसाय चालू आहे. गेली काही वर्षे हा व्यवसाय सुरू असून व्यवसायाचे उद्दिष्ट असे की हा व्यवसाय संपूर्णतः हायजेनिक म्हणजे संपूर्ण ऍग्रो वेस्ट पर्यावरणाला कोणतीही बाधा न आणणारा आहे. या व्यवसायामुळे झाडांची होणारी कत्तल पूर्णपणे थांबवण्यात यश मिळत आहे. व्यवसायातील उत्पादनाचा वापर जसे की दररोज इंधनासाठी म्हणजे दूध संघ, औषध कंपन्या इंधनासाठी मोठ्या प्रमाणात
लाकूड वापरतात. झाड तोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. त्याला पर्याय म्हणून साखर कारखान्याचे बगॅस ,मळी, पोल्ट्री वेस्ट, उसाचा पाला आदी कच्च्या मालापासून जैविक कोळसा तयार केला जातो. ह्या प्रकल्पामुळे हजारो झाडांची कत्तल थांबली आहे. ते केवळ महाराष्ट्र बायो (श्रावस्ती ब्रिक्वेट कागल पंचतारांकित एमआयडीसी कागल) या व्यवसायाचे मालक अमर कदम यांच्या व्यवसायामुळेच. यासह साखर कारखान्याचे बगॅस मळी यापासून प्रोडक्ट तयार केले जाते. पर्यावरण पूरक व्यवसाय सुरू केल्याबद्दल त्यांना आदर्श उद्योजक म्हणून पुरस्कार देण्यात येत आहे.