आदर्श शिक्षिका : सौ. अनिता कुंडलिक सातवेकर यांची प्रेरणादायी कामगिरी
schedule26 Nov 25 person by visibility 12 category
कोल्हापूर:
सदाशिवनगर–हमिदवाडा (ता. कागल) येथील आदर्श बाल विद्यालय मधील सहाय्यक शिक्षिका सौ. अनिता कुंडलिक सातवेकर (सौ. अनिता सुशील पाटील) या खर्या अर्थाने “आदर्श शिक्षिका” म्हणून नावारूपास येत आहेत. २०१४ पासून अवघ्या चार हजार मानधनावर सेवा बजावत असूनही शिक्षणाची अखंड ज्योत तेवत ठेवण्याचे उल्लेखनीय कार्य त्या करत आहेत.
विद्यार्थी–केंद्रित उपक्रमांचे प्रभावी आयोजन
अनिता मॅडम शाळेत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि प्रात्यक्षिक उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी अतिशय यशस्वीपणे करतात.
क्षेत्रभेटी, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रकल्प, प्रदर्शन, सहली यांचे काटेकोर आयोजन
साखर कारखान्यातील कामगारांच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यावर विशेष भर
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न
कामगारांच्या मुलांसाठी हक्काची ‘आई’
या शाळेत मोठ्या प्रमाणात कामगारांच्या मुलांचा सहभाग आहे. अशा मुलांना शिक्षणाची अडचण येऊ नये म्हणून मॅडम स्वतःहून पुढील मदत करतात –
शालेय गणवेश, स्पोर्ट्स किट, वह्या–पुस्तके, सांस्कृतिक कार्यक्रम, वनभोजन व सहलींची फी स्वतः भरतात
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी घरभेटी व समुपदेशन
अनेक मुलांचा शाळेत येण्या–जाण्याचा खर्च स्वतः उचलत त्यांचा शैक्षणिक प्रवास सुरू ठेवण्याची धडपड
सामाजिक जाणीव व पर्यावरण संवर्धन
वनविभागाच्या “एक पौधा–माँ के नाम” या उपक्रमात वनपाल सौ. प्रतिभा पाटील व वृक्षमित्र श्री. नामदेव चौगले यांच्यासह त्यांनी मोठे योगदान दिले.
माता–पालक जाणीव जागृती कार्यक्रम, वनसंवर्धन, ग्रामस्थांना सरकारी योजनांची माहिती देणे अशी उपक्रमशीलता त्यांनी दाखवली आहे.
अडचणींवर मात करूनही अविरत सेवा
अचानक शाळेची मान्यता रद्द झाल्याने त्यांचे काम प्रलंबित असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. तरीही फक्त चार हजार मानधनावर त्या निष्ठेने सेवा देत आहेत.
माजी खासदार सदाशिवराव मंडलिक साहेबांनी कामगारांच्या मुलांसाठी सुरू केलेल्या शाळेचा उद्देश कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे.
---
वैयक्तिक माहिती
नाव: श्रीम. अनिता कुंडलिक सातवेकर (बदलेले नाव – सौ. अनिता सुशील पाटील)
जन्म: २८ फेब्रुवारी १९८७
शिक्षण: B.A., D.Ed., B.Ed.
पद: सहाय्यक शिक्षिका
शाळा: आदर्श बाल विद्यालय, सदाशिवनगर–हमिदवाडा, ता. कागल, जि. कोल्हापूर
पत्ता: पाटील गल्ली, मु. वेलुकी, पोस्ट–खाडकेवाडा, ता. कागल
---