आदर्श शिक्षिका सन्मान : श्रीमती ज्योती मसा कांबळे यांचा गौरव
schedule26 Nov 25 person by visibility 9 categoryशैक्षणिक
कोल्हापूर :
कागल तालुक्यातील जीवन शिक्षण विद्यामंदिर, रणदेवीवाडी येथील सहाय्यक शिक्षिका श्रीमती ज्योती मसा कांबळे (बी.ए., डी.एड.) यांनी त्यांच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यातून उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्यात तसेच जिल्ह्याच्या पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे योगदान देत प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती परीक्षांचे मार्गदर्शन, क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धांतील तालुका व जिल्हास्तरीय निवडी, तसेच मिळविलेले उत्कृष्ट क्रमांक यामुळे त्यांची शैक्षणिक कामगिरी विशेष ठळक ठरते.
शिक्षिका म्हणून प्रशिक्षण उपक्रम, संघटन कौशल्य, आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने बजावले आहे. शाळेमध्ये ‘सात क्रमांक’ या घटकाअंतर्गत व्यक्तिमत्व विकास, अभ्यास मार्गदर्शन व प्रेरणादायी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याचे मोलाचे कार्य त्या करीत आहेत.
याच कार्याची दखल घेत परिसरातील आदर्श शिक्षकांनी त्यांचा विशेष गौरव केला असून, त्या आदर्श शिक्षिकेचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव करताना सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विद्यार्थ्यांच्या यशात मोलाची भूमिका बजावणाऱ्या ज्योती मॅडम या अनेक तरुण शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. 🙏✨