बाळासाहेब कांबळे यांना आदर्श मुकनायक पुरस्कार
schedule31 Mar 25 person by visibility 146 categoryसामाजिक

कोल्हापूर;
कृती फाउंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने दिंडनेर्ली, ता. करवीर, ) येथील बाळासाहेब हिंदुराव कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कार जाहीर करण्यात आला. रविवारी (दि.6 एप्रिल) शाहू स्मारक भवन कोल्हापूर, येथे साडेचार वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
कांबळे हे रा. प. महामंडळामध्ये चालक पदावर 23 वर्ष विना अपघात (सुरक्षित सेवा) काम बजावतं आहे, या दरम्यान हजारो लिटर डिझेल बचत करून लाखो रुपये एसटी महामंडळाचे उत्पन्नात वाढविण्यासाठी प्रयत्न केला, व वाचवले आहेत, गेली 18 वर्ष एसटी च्या दोन बसेस दत्तक घेऊन त्यांची दैनंदिन देखभाल, रंगरंगोटी, सजावट, स्वच्छता, या गोष्टी काळजीपूर्वक पहात आहे. त्यांनी बसमध्ये प्रवाशांसाठी पिण्यासाठी स्वच्छ व मुबलक पाणी, प्रथमोपचार पेटी, औषधे, मोवाईल चार्जिंगची सोय, सुट्टे पैसे, सुई दोटा, बस स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा पेटी, वर्तमानपत्रे, मासिके, 100 ते 150 पुस्तकांचं फिरते वाचनालय, आपत्कालीन परिस्थितीत खडीसाखर, कांदा, आलं, बिस्कीट, आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
ते सर्वच राष्ट्रीय महापुरुषांची जयंती आगारामध्ये व एसटी बस मध्ये साजरी करत आहे, त्याप्रसंगी रक्तदान शिबीर आयोजित केली, पुस्तके वाटप केली, वृक्षारोपण केले, पेढे वाटप केले, रस्ता सुरक्षेवावत' आदर्श वाहन चालक वना अपघात टाळा' है पुस्तक वाहनचालकांसाठी स्वतः लिहिले व स्वखर्चाने छापुन त्याच्या 2000 प्रती विविध प्रकारच्या वाहनावरील वाहनचालकांना गुलाब पुष्प व एक पुस्तक भेट देऊन विना अपघात वाहन चालविणे वाहतुकीचे नियम पाळणे बाबतीत प्रबोधन केले, शाळा, महाविद्यालय, रा प म प्रशिक्षण वर्ग (कोल्हापूर, सातारा) येथील नवीन चालक यांना व्याख्यानातून रस्ता सुरक्षिततेबाबत जागृती केली व करत आहे, कोरोणा महामारी लॉकडाऊन काळात हॉटेल बंद होती त्यामुळे एसटी (महाकारगो) मालवाहतूक करण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतील एसटी चालक कोल्हापूर बस स्थानक येथे येत होते त्यांना जेवण मिळतं नव्हते त्यावेळी कांबळे यांनी घरातून जेवणं आणुन जवळ जवळ 150 चालकांना जेवणाची सोय केली. व सामाजिक बांधिलकी जपली, त्याचवेळी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी नगर आगारातील सर्व बसेस स्वच्छ, निर्जंतुक करण्यासाठी स्वच्छतेचं साहित्य भेट दिले, लॉकडाऊनलोड मुळे कोल्हापूर येथे अडकलेल्या कामगारांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने छत्तीसगड राज्याच्या सिमेवर (कोल्हापूर ते देवरी 1200 किमी) सोडण्याची जबाबदारी पार पाडली, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त जनकल्याण सामाजिक सेवा संस्था दिंडनेली कोल्हापूर या संस्थेमध्ये संचालक म्हणून काम करत असताना संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या सामाजिक सेवा कार्यामध्ये सहभागी असतो, महिला सक्षमीकरण, लेक वाचवा अभियान, व्यसनं मुक्ती, झाडं लावणे व ती जगवण्यासाठी कष्ट घेणे, झाडं (टोप) वाटणं, रक्तदान, नेत्रदान, अवयवदान, अंध, अपंग, कुष्ठरोगी, अनाथ मुलांना मदत, जनकल्याणची गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, पर्यावरण मोटरसायकल रॅली सहभाग, सर्प प्रदर्शन, आरोग्य शिबीर आयोजित केली, पक्षासाठी घरटी बांधली, तुळशी टोपं वाटप केली, वाढदिवसाच्या निमित्ताने विटा एसटी आगारात वृक्षारोपण केले.
कांबळे यांचे कार्याची दखल घेऊन कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र शासन, गुणवंत कामगार पुरस्कार 2015 आदर्श चालक, आदर्श व्यक्तिमत्व, गुणवंत कामगार, आदर्श सामाजिक सेवा, कोटरोणा योद्धा, आधार जीवन गौरव, मंथन जीवन गौरव पुरस्कार, आदी 52 राज्यस्तरीय पुरस्कार देऊन विविध सामाजिक सेवा संस्थानी गौरवलं आहे.